मुंबई

तळा नगरपंचायत निवडणुकीत चार उमेदवारी अर्ज मागे

CD
तळा येथे रंगणार १४ उमेदवारांच्या लढती शेवटच्या दिवशी चार उमेदवारी अर्ज मार्ग; चुरस वाढणार तळा, ता. १२ (बातमीदार) : तळा नगरपंचायतीच्या चार प्रभागांत चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने चुरस वाढली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात १४ उमेदवारांची लढत रंगणार आहे. त्यात प्रभाग १ मध्ये दुरंगी, प्रभाग ३ मध्ये तिरंगी, प्रभाग १० मध्ये चौरंगी, प्रभाग १४ पंचरंगी अशा लढती होणार आहेत. तळा नगरपंचायत निवडणूक २१ डिसेंबरला पार पडली. त्या वेळी एका जागेवर शिवसेनापुरस्कृत अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने १२ जागेवर ३५ उमेदवारांमध्ये निवडणूक पार पडली होती. ओबीसी आरक्षणामुळे चार जागेवर स्थगिती आली. ती निवडणूक १८ जानेवारीला पार पडणार आहे. निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत (ता. १०) चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत निवडणूक रिंगणात १४ उमेदवार उभे आहेत. चार प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादी व शिवसेना अशी दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये शेकाप, शिवसेना व राष्ट्रवादी अशी तिरंगी, तर प्रभाग क्रमांक १० मध्ये शिवसेना, भाजप, शेकाप व राष्ट्रवादी अशी चौरंगी लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये राष्ट्रवादी, शिवसेना व तीन अपक्ष अशी पंचरंगी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या चार प्रभागांत होणाऱ्या निवडणुकीवर आता सगळ्यांचे लक्ष लागले असून, सर्वच पक्षांना ताकद लावावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT