मुंबई

आजपासून नीट समुपदेशनला सुरुवात

CD
आजपासून नीट समुपदेशनला सुरुवात मुंबई, ता. ११ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मेडिकल कौन्सिलिंग कमिटीमार्फत (एमसीसी) नीट पीजी समुपदेशनाची प्रक्रिया बुधवारपासून (ता. १२) सुरू होत आहे. ऑल इंडिया कोटा अंतर्गत उपलब्ध असलेल्या जागांसाठी प्रथमच ही प्रक्रिया चार टप्प्यात पार पडणार आहे. यापूर्वी समुपदेशनाच्या दोनच फेऱ्या होत होत्या. नीट-पीजी परीक्षा ११ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर झाला. त्यानंतर सुमारे ४५ हजार पदव्युत्तर जागांसाठी विद्यार्थी समुपदेशन प्रक्रिया सुरू होण्याची वाट पाहत होते. यापूर्वी समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीनंतर शिल्लक राहिलेल्या जागा राज्यांना परत केल्या जात होत्या. यंदा मात्र तसे होणार नाही. यंदा सर्व जागा ऑल इंडिया कोटामध्ये समर्पित केल्या जाणार असल्याने यातून मोठ्या प्रमाणावर स्थानिक आणि ऑल इंडिया कोट्यातील विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे देशाच्या वैद्यकीय सेवेला बळकटी येईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जे नव्हतं घडायला, तेच झालं! भारताच्या T20 World Cup मोहिमेला धक्का, स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार; अनकॅप्ड खेळाडूचा आधार

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

SCROLL FOR NEXT