मुंबई

अनधिकृत रेतीमाफियांवर कारवाई

CD
खानिवडे रेतीबंदरावर धडक कारवाई ११ बोटी, १० सक्शन पंप निकामी नालासोपारा, ता. ११ (बातमीदार) : वसई तालुक्यात अवैधपणे रेती उपसा चालू आहे. वसई तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी खानिवडे रेती बंदर येथे सोमवारी (ता. १०) धडक कारवाई करत ११ बोटी साखरमिश्रित पाण्याने नष्ट; तर १० सक्शन पंप निकामी केले आहेत. वसई तालुक्यातील रेती बंदरावर रेती उपसा करून, वाहतूक करण्यावर न्यायालयाचे निर्बंध आहेत, पण या निर्बंधांना झुगारून रेती माफिया अनाधिकृत रेती उत्खनन करत आहेत. विरार हद्दीत खानिवडे, नारंगी, काशीद-कोपर, चांदीप, उसगाव, शिरगाव, वैतरणा यासह अन्य ठिकाणी रेती बंदर आहेत. वर्षानुवर्षे संक्शन पंपाने या बंदरावर रेतीउपसा केल्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सर्व रेतीबंदर बंद असतानाही खानिवडे रेतीबंदरावर चोरून बोट आणि सक्शन पंपाच्या साह्याने रेतीउपसा सुरूच असल्याची माहिती वसईच्या तहसीलदार उज्ज्वला भगत यांना मिळाली होती. महसूलचे नायब तहसीलदार, तलाठी, मंडळाधिकारी, पोलिस यांचे विशेष पथक तयार करून, सोमवारी खानिवडे रेती बंदरावर छापा टाकला. अधिकाऱ्यांना पाहताच तेथील रेतीमाफिया फरार झाले. बंदरावर मिळालेल्या ११ बोटी आणि १० संक्शन पंपांच्या इंजिनमध्ये साखरमिश्रित पाणी टाकून ते निकामी करत उ‍ध्वस्त केले आहेत. नालासोपारा : खानिवडे रेती बंदरावर अवैध रेतीउपशावर कारवाई करण्यात आली. (छायाचित्र : विजय गायकवाड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT