मुंबई

मेट्रो- ४ चे काम फास्ट ट्रॅकवर

CD
मेट्रो- ४ चे काम फास्ट ट्रॅकवर पिलरवर गर्डर टाकण्यास सुरुवात; घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ११ : वडाळा ते कासारवडवली मेट्रो- ४ ही २०२४ पर्यंत सुरू करण्याच्या दिशेने कामाला वेग आला आहे. त्याअनुषंगाने ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील कासारवडवली- गायमुखपर्यंतच्या ओवळा सिग्नल ते वेदांत हॉस्पिटल, घोडबंदर मार्गावर पिलरवर गर्डर टाकण्याचे काम मे. जे. कुमार इन्फाप्रोजेक्ट कंपनीमार्फत सुरू होणार आहे. या वेळी ठाण्याकडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असून कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे. गर्डर टाकण्याचे काम रात्रीच्या सत्रात होणार आहे. त्याची सुरुवात १० जानेवारीपासून झाली आहे. रात्री ११ ते पहाटे ५च्या दरम्यान काम करण्यात येईल. हे काम १५ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या वेळेत पोलिस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका ग्रीन कॉरीडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वाहतूक बंदी लागू राहणार नाही, असे ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी कळविले आहे. --- प्रवेश बंद - मुंबई-नाशिक महामार्गाच्या घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना तत्त्वज्ञान विद्यापीठ, कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद असणार आहे. - मुंबईकडून कापूरबावडी जंक्शन, तत्त्वज्ञान विद्यापीठ मार्गे घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना माजीवाडा गोल्डन डाईज ब्रिजवर वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग - मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने ही कापूरबावडी सर्कल येथून उजवे वळण घेऊन बाळकुम नाका, भिवंडी आग्रा रोड, कशेळी, काल्हेर, अंजुर फाटा, भिवंडी मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच इतर हलकी वाहने ओवळा सिग्नल येथे डावीकडे वळण घेऊन विहंग सोसायटीसमोरून उजवीकडे वळण घेऊन घोडबंदर रोडमार्गे इच्छित स्थळी जातील. - मुंबईहून कापूरबावडी जक्शन दिशेने येणारी जड-अवजड वाहने ही नाशिक रोडने खारेगाव टोलनाका, मानकोली नाका, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

Parbhani News: फ्लॅट संस्कृती वाढली; पण घर घेणे झाले महाग!; रेडीरेकनर दरवाढीचा फटका;नागरिकांचे बजेट कोलमडले

IPL Viral Video: ए चल निघ आता... इशान किशनला आऊट करत SRH च्याच गोलंदाजाचा रागात इशारा, मग पुढे...

Raam Navami 2026: रामनवमीपूर्वी 'या' 5 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी निश्चित अन् माता लक्ष्मीचे आगमनही होईल

ना कुत्रा ना मांजर; पूजा सावंतला घरात पाळायचा आहे हा भयंकर प्राणी ! अभिनेत्रीचा खुलासा

SCROLL FOR NEXT