मुंबई

पालिकेत होणार आयुर्वेदिक आणि होमियोपथी डॉक्टरांची भरती

CD
वसई-विरार पालिकेत होणार डॉक्टरांची भरती विरार, ता. ११ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिका हद्दीत करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अधिक डॉक्टरांची गरज लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने डॉक्टर भरतीस सुरुवात केली आहे. पालिकेने बंद केलेले करोना उपचार केंद्र पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी डॉक्टरांची गरज लागणार असून यासाठी अधिक ३० डॉक्टरांच्या ठेका पद्धतीवरील नियुक्तीस परवानगी दिली गेली आहे. यामध्ये १५ आयुर्वेदिक आणि १५ होमियोपथी डॉक्टरांचा समावेश आहे. वसई-विरार महापालिका हद्दीत दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. मागील पाच दिवसांत चार हजाराच्या आसपास रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पालिकेने तात्पुरती बंद केलेली करोना उपचार केंद्रे पुन्हा सुरू केली आहेत. यामध्ये बोळिंज आणि नालासोपारा येथील रुग्णालयांचा समावेश असून वरुण इंडस्ट्री येथील उपचार केंद्राचादेखील समावेश आहे. तसेच पालिका आता म्हाडाच्या इमारतीत उपचार केंद्र तयार करत आहे. या ठिकाणी २०० फ्लॅटचा समावेश आहे. या डॉक्टरांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ठेका पद्धतीवर घेण्यात येणार असून त्यासाठी पालिकेने नियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे उपचार केंद्रात या डॉक्टरांचा अधिकाधिक फायदा रुग्णांना होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : ज्ञानेश कुमार यांना तूर्तास दिलासा मात्र विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालय गंभीर; केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस

भन्नाट... भुवनेश्वर कुमार भारतीय संघात परतला; कृणाल पांड्या, नितीश राणा यांनाही संधी, जाणून घ्या केव्हा व कुठे होणार स्पर्धा...

'आई कुठे काय करते' मालिकेतून अचानक काढून टाकलं; लोकप्रिय लेखिकेचा मोठा खुलासा; मला काही येत नव्हतं असं...

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांना निलंबित करण्याच्या याचिकेवर अंतरिम आदेशास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Satara Crime News: साताऱ्यात धक्कादायक घटना! मोबाईल आणि टीव्हीवरून वाद, बॅटचा फटका अन् १७ वर्षीय मुलीचा मृत्यू; बापाचा राग अनावर अन्..

SCROLL FOR NEXT