मुंबई

विकासकांकडून होणाऱ्या फसवणुकीला बसणार चाप

CD
बांधकाम प्रकल्पाची प्रगतीची माहिती ऑनलाईन विकासकांकडून होणाऱ्या फसवणुकीला बसणार चाप सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ११ : बांधकाम प्रकल्प पूर्ण झाल्याबाबत इंजिनिअर,आर्किटेक्टकडून बनावट प्रमाणपत्र सादर करून अनेक विकासक ग्राहकांची दिशाभूल करतात. ग्राहकांच्या फसवणुकीला चाप लावण्यासाठी महारेराने विकासकांनी सादर केलेली प्रमाणपत्र आता महारेराच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. यामुळे विकासकांकडून होत असलेल्या बनवाबनवीला चाप बसणार आहे. राज्यातील बांधकाम प्रकल्पाची नोंदणी विकासकांना महारेराकडे करावी लागते. त्यानुसार प्रकल्प कधी पूर्ण होणार आणि त्याची सद्यस्थितीची माहिती विकासकाला संकेतस्थळावर अपलोड करावी लागते. प्रकल्पाचे काम जसजसे पूर्ण होईल, त्या टप्प्यानुसार विकासक घर खरेदीदार ग्राहकाकडून पैसे घेतात; मात्र काही विकासक बांधकाम अपूर्ण असतानाही इंजिनिअर, आर्किटेक्ट यांची खोटी प्रमाणपत्र सादर करून कामांचे टप्पे पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दर्शवत ग्राहकांकडून पैसे घेतात. हे प्रकार रोखण्यासाठी प्रकल्पांच्या प्रगतीबाबत विकासकांनी सादर केलेल्या मुख्य अर्जाची माहिती सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. --- महारेराकडे दाद मागता येणार विकासकांनी प्रकल्पांच्या प्रगतीशी संबंधित सादर केलेले अर्ज क्रमांक १, २, ३, ५ आणि २अ ची माहिती सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घर खरेदी केलेल्या ग्राहकांना बांधकामाच्या ठिकाणी जाऊन कामाची सद्यस्थिती पाहता येणार आहे. विकासकाने फसवणूक केली असल्यास याबाबत ग्राहकांना महारेराकडे दाद मागता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT