मुंबई

स्मशनात राजकारण रंगू लागले

CD
स्मशानात राजकारण रंगू लागले श्रद्धांजली कार्यक्रमात इच्छुकांचा प्रचार वाशी, ता. १३ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे गेल्या आहे. पण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. सद्यःस्थितीत तर स्मशानभूमीमध्येही निवडणुकीचा प्रचार होत असल्याचे दिसून येत आहे. स्मशानभूमीत अग्‍नी दिल्यानंतर इच्छुक उमेदवार मयत व्यक्तीबद्दल दुःख व्यक्त करताना आपल्या कामाचा पाढाच वाचत आहे. त्यामुळे मृत व्यक्‍तीचे नातेवाईक, मित्र मंडळींना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. नवी मुंबई महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना गतवर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात आली. त्यांनतर इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियासह नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार सुरू केला होता. मात्र मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर अनिश्चित काळासाठी निवडणुका पुढे गेल्‍या. या काळात इच्छुक उमेदवारांनी प्रभागातील मतदारांपर्यंत पोचण्यासाठी अन्नधान्याचे किट, अर्सेनिक अल्‍बमच्या गोळ्या, शैक्षणिक साहित्‍य वाटपाबरोबरच रुग्‍णांना त्वरित आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍या. निवडणुकांच्या गप्पांचे फड आता पुन्हा निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्‍यता लक्षात घेत इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिघा येथील स्मशानभूमीमध्ये इच्छुक उमेदवारांकडून चक्क प्रभागात झालेल्या कामांचा पाढाच वाचला जात असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे स्मशनभूमीपर्यंत राजकारण रंगू लागले असून याठिकाणीही निवडणुकांच्या गप्पांचे फड रंगू लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT