मुंबई

विधी सेवा प्राधिकरणाच्या टेबल कॅलेंडरचे अनावरण

CD
विधी सेवा प्राधिकरणाच्या टेबल कॅलेंडरचे अनावरण धारावी, ता. ११ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात न्यायमूर्ती ए. ए. सय्यद यांच्या हस्ते आणि न्यायमूर्ती एस. एस. शिंदे, न्यायमूर्ती पी. बी. वराळे, न्यायमूर्ती एस. जे. काथावाला यांच्या उपस्थितीत टेबल कॅलेंडर आणि डायरीचे अनावरण केले. या टेबल कॅलेंडरमध्ये राज्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समितीद्वारे प्रत्येक महिन्यात आयोजित केलेल्या विशेष दिवसांची आणि इतर समान किमान कार्यक्रमांची यादी देण्यात आली आहे. कॅलेंडरमधील प्रत्येक महिना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या विशिष्ट योजनेसाठी समर्पित आहे. ज्याचा उद्देश समाजातील गरीब आणि उपेक्षित घटकांना आणि विविध गुन्हेगारी किंवा आपत्तींना बळी पडलेल्यांना कायदेशीर विधी सेवा व मदत प्रदान करणे हा आहे. या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाद्वारे नियोजित समान किमान कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती आणि काही सरकारी कार्यालयांमध्ये हे टेबल कॅलेंडर वितरित केले जातील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव हितेंद्र वाणी यांनी दिली. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT