मुंबई

मकरसंक्रांतीवर कोरोनाची संक्रांत

CD
मकरसंक्रांतीवर कोरोनाची संक्रांत रेवदंडा, ता. १२ (बातमीदार) : कोरोनाची पहिली लाट ओसरली, त्या वेळी नागरिकांनी मकरसंक्रांतीचा सण उत्साहात साजरा केला होता. आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे मकरसंक्रांतीवर कोरोनाची संक्रांत आली आहे. बाजारपेठ जरी मकरसंक्रांतीसाठी सजले असले तरी ग्राहकराजा हव्या त्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे महिलांच्या वाण लुटण्याचा कार्यक्रमाची अनिश्चितता जाणवत आहे. त्यामुळे कुठेही खरेदी होताना दिसत नाही. संक्रांती सणासाठी फुल बाजारातील भाव वधारलेले आहेत; पण ग्राहकराजाच दिसत नाही. याशिवाय, महागाई आणि लालपरीचा चिघळलेला संप यामुळेही बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ घटली आहे. अनेक नोकरदार महिलांची तर तयार तीळगुळ आणि हलव्याला पसंती देत आहेत. वाण देण्यासाठी सुकडी विक्री करणारे व्यावसायिकही ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवाजी पार्कसाठी ठाकरे बंधू अन् भाजप-शिंदेसेनेचाही अर्ज, एकच तारखा; कुणाला मिळणार परवानगी?

Crime News: काकाच्या हत्येचा बदला? नमाजानंतर चाकूहल्ला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल ठार, जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट!

Latest Marathi News Live Update : राज्यात ढगाळ हवामान, किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता

भाविकांसाठी बातमी! विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन तीन दिवस राहणार बंद; मूर्तीवर लवकरच हाेणार रासायनिक प्रक्रिया..

BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

SCROLL FOR NEXT