मुंबई

टोयोटाच्या `कॅमरी हायब्रीड`ची घोषणा

CD
टोयोटाच्या `कॅमरी हायब्रीड`ची घोषणा मुंबई, ता. १२ : टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) आज त्यांच्या कॅमरी या लक्झरियस सेदान कारचे हाइब्रीड व्हेरिएंट लाँच करण्याची घोषणा केली. या कारच्या डिझाईनमध्ये आकर्षक बदल करून ती पुन्हा नव्या रुपात भारतीय बाजारात आणली जाणार आहे. कॅमरीची एक्स शोरूम किंमत ४१ लाख ७० हजार इतकी ठेवण्यात आली असून, संपूर्ण भारतात तिची किंमत सारखीच राहणार असल्याचे टोयोटाकडून सांगण्यात आले. कॅमरी हायब्रीड पॉवर आणि लक्झरियस सफारीचे अद्‍भुत मिश्रण आहे. वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या टोयोटाच्या प्रयत्नांना कॅमरी ही कार मूर्त रूप देत असल्याचे टीकेएमचे विक्री आणि विपणन विभागाचे सहायक उपाध्यक्ष अतुल सूद यांनी सांगितले. कॅमरी कारमध्ये २.५ लिटर, ४ सिलिंडर गॅसोलिन हायब्रीड डायनामिक फोर्स इंजिन दिले असून, जो शक्तिशाली मोटर जनरेटरच्या साह्याने १६० किलोवॅट (२१८ पीएस) ताकद निर्माण करते. या कारमध्ये स्पोर्ट, इको आणि नॉर्मल आदी ड्रायव्हिंग मोड दिले आहेत. व्हेंटिलेटेड सीट्स, चालकाचे १० विविध पद्धतीने ॲडजस्ट होणारी सीट, ओआरव्हीएम, वायरलेस मोबाईल चार्जर, स्लाईड मून रूफ तसेच इतर अनेक फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत. ही सेल्फ चार्जिंग हायब्रीड इलेक्ट्रिक सेदान कार प्लॅटिनम व्हाईट पर्ल, सिल्वर मेटॅलिक, ग्राफाईट मेटॅलिक, रेड माईका, एटीट्यूड ब्लॅक आणि बर्निंग ब्लॅक आदी रंगांसोबतच मेटल स्ट्रिम मेटॅलिक या नवीन रंगात उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT