मुंबई

विशेष लसीकरण सत्र

CD
दिव्यांग मुलांसाठी आज विशेष लसीकरण सत्र नेरूळ, ऐरोलीतील रुग्‍णालयात सुविधा सकाळ वृत्तसेवा नवी मुंबई, ता. १२ : १५ ते १८ वयोगटातील दिव्यांग मुलांना सुलभतेने लसीकरण करून घेता यावे यादृष्टीने १३ जानेवारीला विशेष लसीकरण सत्र आयोजन करण्यात आले आहे. नेरूळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय आणि सेक्टर ३, ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत या विशेष लसीकरण सत्राचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी लाभा घ्यावा व लस संरक्षित व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे. १८ वर्षावरील दिव्यांगांकरिता नवी मुंबई महापालिकेच्या वतीने यापूर्वीही विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. दिव्यांग कल्याणकारी दृष्टीकोनातून नियमित कोविड लसीकरणात नवी मुंबई पालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रांवर दिव्यांगांना रांग न लावता लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे २०६ शाळांमध्ये सत्रे आयोजित करीत लसीकरण करण्यात आले आहेत. सरकारने दिलेल्या उद्दिष्टापैकी ३ ते १० जानेवारी २०२२ या कालावधीत पहिल्या टप्प्यात ७७ टक्के मुलांचे लसीकरण करण्यात आले. ११ ते १४ जानेवारी २०२२ या कालावधीत लसीकरण न झालेल्या मुलांची संख्या २० पेक्षा जास्त आहे, अशा शाळांमध्ये लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. तसेच २० पेक्षा कमी मुले बाकी असलेल्या शाळांतील मुलांनी महापालिकेची वाशी, नेरूळ, ऐरोली व तुर्भे अशी चार रुग्णालये आणि २३ नागरी आरोग्य केंद्रे अशा २७ लसीकरण केंद्रांवर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

SCROLL FOR NEXT