मुंबई

पूर्ण लसवंतांनाच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश

CD
पूर्ण लसवंतांनाच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. १२ : ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून विविध कामांसाठी नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. मात्र, जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच सरकारकडून शासकीय कार्यालयांमध्ये देखील कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने परिपत्रक काढत अत्यंत निकडीचे काम असल्यास व लशीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने कोरोना विषाणूच्या बदललेल्या स्वरूपामुळे तिसरी लाट आल्याचे स्पष्ट केल्याने उपाययोजनांबाबतची नियमावली जारी केली आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनानेही सरकारकडील प्राप्त सूचनांचे तंतोतंत पालन करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या अभ्यांगतांना शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. यामध्ये मास्क लावणे, इतरांशी बोलताना नियमाप्रमाणे सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे, लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केलेल्या नागरिकांनाच कार्यालयात प्रवेश देणे, तसेच तातडीच्या कामाशिवाय कार्यालयात येणाऱ्या अभ्यांगतांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांनी काढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: धनगर आरक्षणासाठी मनोज जरांगे आझाद मैदनात! बोऱ्हाडेंना पाठिंबा; म्हणाले, सहा कोटी मराठे...

बीएमसीचा ऐतिहासिक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी घर; पण कोणत्या? जाणून घ्या...

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी वर्षभरानंतर अटकेत

Gas News : गॅस टंचाईमुळे ओतूर-माळशेज पट्ट्यात पुन्हा पेटल्या चुली

Bank News : मार्च एंडची लगबग; जिल्हा बँकेत शेतकऱ्यांची गर्दी वाढली

SCROLL FOR NEXT