मुंबई

विद्यापीठाकडून प्राध्यापकांना नागरी संरक्षणाचे धडे

CD

पुणे, ता. ७ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि राज्य सरकारचे गृह विभाग नागरी संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने ११ मार्चपर्यंत महाविद्यालयांमधील प्राध्यापकांसाठी नागरी संरक्षण प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेचे उद्‌घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या नुकतेच हस्ते झाले.
कार्यशाळेच्या उद्‌घाटनावेळी उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ. विलास उगले, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक अनिल आवारे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे व प्रशिक्षणार्थी प्राध्यापक उपस्थित होते. डॉ. करमळकर म्हणाले,‘‘सरकारच्या बरोबरीने काम करण्यासाठी समाजात अतिरिक्त फौज कार्यरत असणे गरजेचे आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींची तीव्रता कमी होण्यास यामुळे निश्चितच मदत होईल. आपत्ती प्रवण ग्रस्त ठिकाणे आपण शोधू शकलो, तर निदान आपत्ती येण्यापूर्वी आपल्याला काही उपाययोजना त्यावर करता येतील. या महत्त्वपूर्ण शोधांमुळे भविष्यातील अनेक आपत्ती आपण टाळू शकतो. प्राध्यापक प्रशिक्षित झाले तर ते ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोचवतील.’’ डॉ. परचुरे यांनी प्रास्ताविक केले. आवारे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT