मुंबई

उल्हासनगरातील सोंग्याच्या वाडीत बिबट्याचा शिरकाव

CD
सोंग्याच्या वाडीत बिबट्याचा शिरकाव उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) ः मागच्या आठवड्यात अंबरनाथ ऑडन्स कंपनीला लागून असलेल्या जंगलात एक बिबट्या सीसी टीव्हीत कैद झाला होता. आता या बिबट्याने उल्हासनगरातील सोंग्याच्या वाडीत शिरकाव केला आहे. सुभाष टेकडी रोडवर अंबरनाथजवळील वालधुनी नदीच्या काठावर ही सोंग्याची वाडी आहे. जंगल आणि शेकडोंच्या संख्येने झाडे असलेल्या या वाडीचा परिसर १० ते १५ एकराचा आहे. काल (मंगळवार) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी मैत्रिणीसोबत गेलेल्या भरत नगरातील एका मुलीला हा बिबट्या दिसला. वाऱ्यासारखी ही बातमी पसरताच आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाचे अधिकारी प्रमोद ठक्कर, प्रमोद वारके, दिनेश मल्होत्रा यांनी विठ्ठलवाडी पोलिस, काँग्रेसचे पर्यावरण विभागाचे अध्यक्ष विशाल सोनवणे, निर्भय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधीर बागुल आदी समाजसेवकांसोबत काल रात्री उशिरापर्यंत या बिबट्याचा शोध घेतला आहे. दरम्यान, आज सकाळी पुन्हा वन विभागाचे पथक सोंग्याच्या वाडीत दाखल झाले असून त्यांना तीनचार ठिकाणी पंजाचे ठसे दिसले आहेत. या ठश्यांचे फोटो वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवण्यात येणार असून त्याची खात्री झाल्यावर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे आणले जाणार आहेत. स्थानिक नगरसेवक व गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीचे सभापती प्रमोद टाले यांनी उल्हासनगर तालुका वन विभागाचे मुख्य अधिकारी प्रमोद ठक्कर यांना पत्र पाठवले आहे. सोंग्याच्या वाडीत दोन डुकरे अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते पाहता वाडीत बिबट्या असण्याची दाट शक्यता असून त्यासाठी त्याला पकडण्यासाठी तात्काळ पिंजरे लावण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Ahilyanagar Crime: खर्ड्यात तान्हाजी बोराडे खूनप्रकरणाचा दोन दिवसांत छडा; १८ वर्षीय तरुणासह तीन अल्पवयीन ताब्यात

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT