मुंबई

वसई-विरार पालिकेच्या आयुक्तपदी अनिलकुमार पवार

CD
वसई-विरार पालिकेच्या आयुक्तपदी अनिलकुमार पवार विरार/वसई (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांची बदली होऊन त्यांच्या जागी अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपसचिव प्रियांका कुलकर्णी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. गंगाथरन डी. यांना मंत्रालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून गंगाथरन डी. यांची बदली होणार, अशा चर्चा होत्या. त्यांना अखेर मंगळवारी (ता. ११) पूर्णविराम मिळाला आहे. गंगाथरन डी. यांचा कार्यकाळ जुलै २०२० ला संपुष्टात आला होता; परंतु निवडणुकीच्या कामासाठी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. गंगाधरन डी. यांनी त्यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागात केलेले बदल, कर्मचाऱ्यांना लावलेली शिस्त, हयगय करणाऱ्या अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता त्यांनी दाखवत अनेक विकासकामांना हात घातला. मालमत्ता कराशिवाय अन्य कर लागू करून वसुलीवर देखील भर दिला. मराठी भाषेतूनच नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत असल्याने ते लोकप्रिय ठरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

IND vs ENG 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला! ज्याच्यामुळे मागची मॅच हरली, त्याला केले संघाबाहेर; बघा कशी आहे Playing XI

Vasai Virar Local Stop : पावसापुढे रेल्वेची पुन्हा शरणागती; १२ तासांत दुसऱ्यांदा वसई-विरार लोकल ठप्प! लाखो प्रवासी अडकले

Nagpur Crime : ‘एआय’ तंत्रज्ञानाने शोधला निर्घृण मारेकरी; वृद्धेवरील अत्याचार व खुनाचा झाला उलगडा

SCROLL FOR NEXT