मुंबई

खारघरमध्ये केंद्र सरकारचा होमियोपॅथी रुग्णालय सुरू

CD
खारघरमध्ये केंद्र सरकारचे होमिओपॅथी रुग्णालय सुरू अनेक वर्षांनंतर नागरिकांच्या सेवेत; सर्व आजारांवर उपचार होणार खारघर, ता. १२ (बातमीदार) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने खारघर सेक्टर १८ मध्ये खारघर मध्ये उभारण्यात आलेला केंद्रीय होमिओपॅथी रुग्णालय झाल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने खारघर सेक्टर १८ मध्ये प्लॉट नं. ३८, ३९ या भूखंडांवर ६३ हजार १७० स्क्वेअर फूट जागेत १७ कोटी रुपये खर्च करून सेन्ट्रल कौन्सिल फोर होमिओपॅथी रुग्णालयाचे भूमिपूजन २०१५ मध्ये आयुष विभागाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झाले होते. रुग्णालयाचे काम दोन वर्षांत पूर्ण करून नागरिकांसाठी ते खुले केले जाईल, असे आयुष विभागाकडून सांगण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. याविषयी हे रुग्णालय धूळ खात पडून असल्याचे वृत्त ''सकाळ''मध्ये २१ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसिद्ध झाले होते. तसेच, खारघरमधील मनसेचे उपाध्यक्ष गणेश बनकर यांनी पालिका, सिडको आणि आयुष मंत्रालयाकडे पत्रव्यवहार केला होता. अखेर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने डिसेंबरअखेरीस रुग्णालय सुरू झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. रुग्णालयाची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ अशी आहे. तर केसपेपर नोंदणी शुल्क २० रुपये आहे. अधिक माहितीसाठी ९३७२१९७८६४ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. कोट - आयुष रुग्णालय सुरू व्हावे, यासाठी दोन वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू होते. अखेर रुग्णालय सुरू झाल्याने नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. - गणेश बनकर, खारघर उपाध्यक्ष, मनसे आयुष रुग्णालयात चांगल्या प्रकारे उपचार केले जातात. यामुळे नवी मुंबई, पनवेल आदी भागांतून रुग्ण रुग्णालयाचा लाभ घेत आहेत. - मनेश पाटील, रहिवासी, खारघर रुग्णालय नुकतेच सुरू झाले असून, तीन डॉक्टर, परिचारिका आणि इतर असे २० कर्मचारी आहेत. रुग्णालयात सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार केले जात आहे. - डॉ. रमेश बावसकर, केंद्रीय होमिओपॅथी अनुसंधान संस्था (रुग्णालय) खारघर असे आहे रुग्णालय या रुग्णालयात ३० खाटांचा समावेश आहे. तळमजल्यावर रिसेप्सन आणि बाह्यरुग्ण विभाग असेल. दुसरा आणि तिसरा माळ्यावर प्रत्येकी १५ खाटा असतील. त्यात प्रयोगशाळा, सेमिनार हॉलचा समावेश आहे. लवकरच योगा केंद्रही सुरू करण्याचा प्रयत्न आयुष विभागाकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

Gold Rate Today: सप्टेंबरअखेर सोनं 11 हजारांनी स्वस्त! खरेदीदारांना दिलासा; मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात भाव किती?

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याने इमारतीवरून मारली उडी, प्रायव्हेट पार्ट कापलेला; वृंदावनात घटनेने खळबळ!

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT