मुंबई

एसटीच्या विलीनीकरणासाठी नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सकाळ वृत्तसेवा

पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद उघडकीस आला आहे.

मुंबई - शिवसेना (Shivsena) आमदार संतोष बांगर, तानाजी सावंत यांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही विलीनीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

गेल्या अडीच महिन्यापासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणासाठी संप सुरू आहे. त्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य शासनाला तीन सदस्यीय समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. येत्या २० जानेवारीला समितीचा दिलेला १२ आठवड्यांचा कालावधी पूर्ण होणार आहे; मात्र त्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनावेळी विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते.

याबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांनी संपकऱ्यांना वेळोवेळी सांगण्यात आले. त्यामुळे विलीनीकरणाऐवजी एसटी कर्मचाऱ्यांच्या भत्ते आणि मूळ वेतनात वाढ देण्यात आली आहे. शिवाय यापुढेही नियमित वेतन करार आणि वेतनाच्या फरकामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याचे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले; मात्र आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे विलीनीकरणाच्या शिफारशींचं पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद उघडकीस आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Ajinkya Rahane ने बुडणारं जहाज वाचवलेलं, पण त्याला श्रेय मिळालं नाही...', गावसकरांचा भारतीय क्रिकेटवर निशाणा

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये येणार ‘पिंक प्लॅटफॉर्म’! महिला प्रवाशांसाठी मोठा निर्णय; कसा असणार उपक्रम?

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत मोठी कारवाई! विद्यार्थ्यांवर ड्रग्जमाफियांचा डोळा, ४१.६० लाखांच्या अमली पदार्थांसह तस्कर जेरबंद

Marathi Live Updates News: दर्शनासाठी आलेला भाविक पडला थेट खड्ड्यात

पाकिस्तानमध्ये लष्करी उठावाची शक्यता; शाहबाज-झरदारी यांची उडाली झोप, लष्करप्रमुख असीम मुनीर यांची मोठी खेळी

SCROLL FOR NEXT