मुंबई

‘मेस्टा’ १७ जानेवारीपासून शाळा सुरू करणार

CD
शाळा १७ जानेवारीपासून सुरू करणार महाराष्ट्र स्कूल ट्रस्टीज् असोसिएशनचा निर्णय मुंबई, ता. १२ ः कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले; मात्र बहुतांश शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध नसल्याचा दावा करत महाराष्ट्र स्कूल ट्रस्टीज् असोसिएशनने (मेस्टा) १७ जानेवारीपासून आपल्या सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण सचिवांना प्रस्ताव पाठवणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची सुविधा नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुले शिक्षणापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे १७ जानेवारीपासूनच ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा सर्व प्रकारची खबरदारी घेत सुरू करणार आहोत. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, शिवाय मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे पुढे आल्याने आम्ही हा निर्णय घेतल्याची माहिती मेस्टाचे अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील यांनी दिली. दरम्यान, शाळा बंद न करण्याबाबतची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून केली जात आहे, तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचा आढावा घेत १५ फेब्रुवारीनंतर शाळा सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत. -- शिक्षण राज्यमंत्र्यांचा प्रस्ताव दरम्यान, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील शाळा १७ जानेवारीपासून सुरू करण्यासाठी संमती दर्शवली आहे. त्यासाठी आपण लवकरच शालेय शिक्षण सचिवांकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे त्यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! ब्लॉकमुळे ४ लोकल रद्द, दोन दिवस कल्याण-कसारा सेवा बंद; रेल्वे वेळापत्रकात मोठे बदल

तिरडीवरचा अबीर गुलाल पाहून मी... अलका कुबल यांनी सांगितली 'माहेरची साडी'बद्दलची आठवण, म्हणाल्या- स्वतःचं मरण

Eknath Shinde Mobile : एकनाथ शिंदे ब्रिटिश विमानात मोबाईल विसरले, ९ तासांच्या प्रवासानंतर मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी वर्षा बंगल्यावर घेतले गणरायाचे दर्शन

IND vs AFG, Viral Video: कर्णधार श्रेयस अय्यरने मालिका जिंकलीच, पण मनंही जिंकली; अफगाणिस्तानच्या कर्णधाराला बोलावलं अन्...

SCROLL FOR NEXT