मुंबई

एसटी कामगार संघटनेची उच्च न्यायालयात धाव

CD
एसटी कामगार संघटनेची उच्च न्यायालयात धाव मान्यता रद्दला स्थगिती देण्यासाठी याचिका सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १२ : एसटी महामंडळातील मान्यताप्राप्त महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची मान्यता औद्योगिक न्यायालयाने रद्द केली आहे. या निर्णयाला स्थगिती मिळावी, यासाठी कामगार संघटनेने आता उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाची आठ आठवडे अंमलबजावणी होऊ नये, यासाठी कामगार संघटनेने औद्योगिक याचिका दाखल केली होती; मात्र सोमवारी ही याचिका फेटाळून लावण्यात आली. त्यानंतर आता कामगार संघटना उच्च न्यायालयात स्थगितीची याचिका दाखल करणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान करून केवळ संघटनेच्या फायद्याचे निर्णय घेणे, विविध कलमांचे उल्लघंन करण्याचा ठपका स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेवर ठेवत औद्योगिक न्यायालयाने संघटनेची मान्यता रद्द केली होती. यासाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने तब्बल ११ वर्षे न्यायालयीन लढाई दिला होता. दरम्यान, कामगार संघटनेची मान्यता गेल्याने अडचणीत वाढ झाल्याचे स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले आहे; मात्र महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसने (इंटक) याप्रकरणी आधीच कॅव्हेंट दाखल केली असल्याचे महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT