मुंबई

राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अधिवेशन स्थगित

CD
राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अधिवेशन स्थगित मुंबई, ता. १२ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे ठाण्यात होणारे राज्य अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक नुकतीच कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्य संघटनेचे सरचिटणीस बालाजी पवार, कोषाध्यक्ष गोरख भिलारे, उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, संघटना सचिव संजय पावशे, अण्णा जगताप, दत्ता घाडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य अधिवेशन २६ व २७ जानेवारी रोजी ठाणे येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले होते; मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने सर्वच जाहीर कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत. शासनाच्या आदेशानुसार केवळ ५० लोकांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन घेणे संयुक्तिक होणार नाही. त्यामुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले असून कोव्हिडची स्थिती निवळल्यानंतर चर्चा करून अधिवेशनाची तारीख नव्याने जाहीर केली जाईल, अशी माहिती सुनील पाटणकर यांनी दिली. बैठकीत ठाणे येथील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. गरज पडल्यास ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आंदोलन उभारण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT