मुंबई

डीव्ही मोटार गैरप्रकाराची सात तास चौकशी

CD
डीव्ही मोटार गैरप्रकाराची सात तास चौकशी ‘सकाळ’च्या वृत्तानंतर पाच अधिकाऱ्यांकडून तपास प्रशांत कांबळे ः सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १२ : शासकीय परिवहन विभागातील जीटीएस नियंत्रकांकडून करण्यात आलेल्या डीव्ही मोटारींच्या गैरप्रकाराचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर बुधवारी(ता. १२) राजशिष्टाचार विभागाचे चांगलेच धाबे दणाणले. गेल्या दोन महिन्यांपासून कागदावरच असलेल्या चौकशीला अखेर सुरुवात झाली. मंत्रालयातील पाच अधिकाऱ्यांनी वरळीतील शासकीय परिवहन सेवा कार्यालयात सात तास चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य अतिथींच्या वाहनांसंदर्भात केल्या जात असलेल्या निष्काळजीपणावर मुख्यमंत्री कार्यालयाने राजशिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यानंतर बुधवारी मंत्रालयातील पाच अधिकाऱ्यांनी वरळी येथील जीटीएस कार्यालयात येत चौकशीला सुरुवात केली. दरम्यान, डीव्ही मोटारींच्या करण्यात आलेल्या नोंदी आणि तत्कालीन नियंत्रक किशोर गायकर यांनी दिलेला खुलासा तपासण्यात आला. शिवाय गायकर यांनी परवानगी नसताना राज्य अतिथींच्या वाहनांचा करण्यात आलेल्या गैरवापराचे तथ्य शोधण्यात आले असून त्यासंबंधीची कागदपत्रे गोळा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ---- गायकरांच्या कार्यकाळाची चौकशी होणार दरम्यान, डीव्ही मोटार प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशी पथकामध्ये शासकीय परिवहन सेवेच्या नियंत्रक क्रांती पाटील, उपसचिव अशोक साळवे, सामान्य प्रशासन विभाग राजशिष्टाचार कक्ष अधिकारी अभय भंडारी, कक्ष अधिकारी कुलकर्णी, अवर सचिव शिरीष गोडबोले यांचा समावेश होता. या सर्व अधिकाऱ्यांनी चौकशीमध्ये आढळून आलेली कागदपत्रे जप्त केली. तत्कालीन नियंत्रक किशोर गायकर शासकीय परिवहन सेवेत ५ मे २०१९ रोजी रुजू झाले. त्यानंतर डिसेंबर २०२१ नंतर पदोन्नतीवर गेले. यादरम्यानच्या दोन वर्षांतील कालावधीची तपासणी या अधिकाऱ्यांकडून केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Latur Water Crisis : उजनी’ची व्यवहार्यता लालफितीतच; मुख्यमंत्र्यांना लातूरचा दुष्काळ अवगत; पण दहा वर्षांत शाश्वत उपाययोजनाच नाही

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

Asian Games 2026: भारताची नारी शक्ती! नेमबाजांनी जिंकलं कांस्य; मनू भाकरला अपयश पण, कबड्डीत महिलांची बाजी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT