मुंबई

आंबेडकरी साहित्याचे प्रकाशन का रखडले?

CD
आंबेडकरी साहित्याचे प्रकाशन का रखडले? कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १२ : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य तांत्रिक कारणांमुळे प्रकाशित न करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाबाबत कृती अहवाल दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आज दिले. राज्य सरकारने आंबेडकर यांचे लिखित साहित्य आणि भाषणे खंड स्वरूपात प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सुमारे ५.४५ कोटी रुपयांचा प्रिंटिंग पेपर खरेदी करण्यात आला. या खंडाच्या नऊ लाख प्रती छापण्यात येणार होत्या. पण केवळ ३३ हजार प्रती प्रकाशित करण्यात आल्या. तसेच, या प्रकल्पासाठी घेतलेला कागदही गोदामात पडून आहे, असे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. याची स्यूमोटो दखल न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. ए. एस. किल्लोर यांच्या खंडपीठाने घेतली. राज्य सरकारच्या संबंधित समितीने याबाबत कार्यवाही केली आहे. त्यामुळे त्याचा अहवाल सरकारने तीन आठवड्यांत दाखल करावा, असे निर्देश देत न्यायालयाने सरकारला नोटीस बजावली आहे. आंबेडकर यांचे साहित्य सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे. तसेच, संशोधकांकडूनही याची मागणी होत आहे. खंडरुपाने याचे जतन करणे सध्याच्या आणि भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. त्यामुळे या प्रकल्पाची गरज आहे, असे निरीक्षण न्यायालयाने यापूर्वी नोंदविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT