मुंबई

टीआरपी रेटिंग जाहीर करा

CD
टीआरपी रेटिंग पुन्हा जाहीर करा प्रसारणकर्त्यांना केंद्रीय मंत्रालयाचा आदेश नवी दिल्ली, ता. १२ (पीटीआय) ः देशातील प्रसारण कंपन्यांच्या संघटनेने (बीएआरसी) नवी टीव्ही रेटिंग (टीआरपी) तत्काळ जाहीर करावे, असे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत. यासंदर्भातील आपली कार्यप्रणाली व निकष यात सुधारणा करीत असल्याचे ‘बीएआरसी’ने जाहीर केल्याने मंत्रालयाने त्यांना हा आदेश दिला आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये देशात टीआरपी घोटाळा उघड झाला होता. त्यानंतर टीआरपी रेटिंग रद्द करण्यात आली होती. मंत्रालयाच्या आदेशानंतर आता जवळपास १५ महिन्यांपासून बंद असलेले वृत्तवाहिन्यांचे टीआरपी रेटिंग पुन्हा सुरू होणार आहे. ब्रॉडकास्टर्स ऑडियन्स ॲण्ड रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) ने ही रेटिंग जाहीर करावीत. सध्याचा खरा कल कळण्यासाठी मागील तीन महिन्यांचे रेटिंग दरमहाच्या स्वरूपात जाहीर करावे, असे निर्देशही मंत्रालयाने दिले आहेत. टीआरपी सेवेच्या वापरात ‘रिटर्न पाथ डाटा’चा समावेश करण्याबाबत विचार करण्यासाठी मंत्रालयाने प्रसार भारतीच्या सीईओंच्या अध्यक्षतेखाली कार्यगटही नेमला आहे. ट्राय तसेच टीआरपी कमिटीनेही तशीच शिफारस केली होती. हा कार्यगट आपला अहवाल चार महिन्यांत देणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT