मुंबई

शिक्षण विभागाला लवकरच मिळणार नवे प्रधान सचिव

CD
शिक्षण विभागाला लवकरच मिळणार नवे प्रधान सचिव मुंबई, ता. १२ : शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा यांची पुढील महिन्यात मुदत संपत असल्याने राज्याला लवकरच नवीन शिक्षण सचिव मिळणार आहेत. या पदासाठी तब्बल अर्धा डझनहून अधिक सनदी अधिकाऱ्यांनी आपली इच्छा दर्शवली असल्याने फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत शिक्षण विभागाला नवीन प्रधान सचिव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वंदना कृष्णा या निष्क्रिय सचिव असल्याचा आरोप करत शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्यासह शिक्षक आमदार नागो गाणार यांनीही त्यांच्या हकालपट्टी करून त्यांच्या ठिकाणी चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम, शैक्षणिक गुणवत्तावाढ आदींसाठी कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना आणि नवीन कार्यक्रम देण्यासाठी त्या अपयशी ठरल्याचे सांगत शिक्षक आमदार गाणार यांनी तर राज्यपालांकडेही याविषयीची एक ‍तक्रार नोंदवली होती. मात्र आता वंदना कृष्णा यांची मुदतच संपत आल्याने अनेक अधिकाऱ्यांनी शिक्षण सचिवपदी येण्याची आपली इच्छा व्यक्त केली असून काही अधिकाऱ्यांनी आपली लॉबिंगही सुरू केली असल्याचे अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT