मुंबई

कांबे गावाच्या पाणी शुद्धीकरण यंत्रणेसाठी निधी द्या

CD
कांबे गावाच्या पाणी शुद्धीकरण यंत्रणेसाठी निधी द्या पंचम कालानी यांचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना साकडे उल्हासनगर, ता. १३ (वार्ताहर) ः दिवंगत आमदार ज्योती कलानी यांनी कांबा गावाला पाईपलाईनद्वारे पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांना त्यात यश आले. पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईन यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र, पाणी शुद्धीकरण यंत्रणेचे काम अपूर्ण आहे. या कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी कमी पडत आहे. या निधीची तरतूद करण्यात आली तर नागरिकांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा, माजी महापौर पंचम कालानी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. जयंत पाटील यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याव्यतिरिक्त उल्हासनगर शहराला एमआयडीसीच्या शहाड पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा होत आहे. त्याबदल्यात पालिका दर महिन्याला एमआयडीसीला पाण्याचे बिल देत आहे. त्या अनुषंगाने सदर पंपिंग हे पालिकेकडे हस्तांतरित केल्यास त्याचा फायदा पालिकेला होईल, त्यामुळे पंपिंगचे हस्तांतरण करण्यात यावे, अशी मागणी देखील पंचम कालानी यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली. यावेळी कांबा गावच्या सरपंच भारती भगत, राष्ट्रवादीचे युवानेते कमलेश निकम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

गोरं होण्यासाठी औषधांचं अतिसेवन बेतलं जीवावर? डोळ्यातून रक्त, मृतदेह पालथा; २२ वर्षीय BAMS डॉक्टरच्या मृत्यूने अमरावतीत खळबळ

Latest Marathi News Update : आम्ही ECI च्या विवेकाधिकाराची जागा घेऊ शकत नाही - सुप्रीम कोर्टाचं महत्वाचं निरीक्षण

SCROLL FOR NEXT