मुंबई

कशेडी-हातखंबा मार्गावर चालकांना दणका

CD
कशेडी-हातखंबा मार्गावर चालकांना दणका वर्षभरात २ कोटींचा दंड वसूल; ४५ हजार ९६१ जणांवर कारवाई पोलादपूर, ता. १३ (बातमीदार) : महामार्गावर वाहन चालवताना नियमांचे पालन करावे, असे निर्देश आहे. मात्र, अजूनही वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहेत. वर्षभरात वाहतूक विभागाने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा मध्यभाग असलेल्या आणि महत्त्वाचा घाट मानला जाणाऱ्या कशेडी ते हातखंबा या मार्गावरील वाहतूक पोलिसांनी ४५ हजार ९६१ वाहनचालकांवर कारवाई करत २ कोटी १२ लाख ४० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये कशेडी विभागांतर्गत १५ हजार ४७ वाहनचालकांवर कारवाई करत ७१ लाख २७ हजार ४०० रुपयांचा दंडवसुली केली आहे. देशात रस्ते अपघातामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने राज्यात होणारे अपघात आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत घट करण्यासाठी सर्वेक्षण केले. यात वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याचे प्रामुख्याने दिसून आल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने अपर पोलिस महासंचालक वाहतूक भुषण कुमार उपाध्याय, रायगड परीक्षेत्र महामार्ग पोलिस अधीक्षक सुनिता साळुंके ठाकरे, महामार्ग पोलिस रायगड विभाग, पोलिस उपअधीक्षक संदीप बगाडीकर, महामार्ग पोलिस रत्नागिरी विभाग, पोलिस निरीक्षक रेश्मा कुंभार, पोलिस उपनिरीक्षक अनिल चांदणे, वसंत केसरकर, सहायक पोलिस अधीक्षक अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कशेडी, चिपळूण, हातखंबा टॅपवरील वाहतूक पोलिसांनी नियमांचा भंग करणाऱ्या ४५ हजार ९६१ वाहनचालकांवर कारवाई केली आहे. यामध्ये विना हेल्मेट, विना सीटबेल्ट, वेगमर्यादा उल्लंघन, मोबाईलचा वापर, मालगाडीतून प्रवासी वाहतूक, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, विना इन्शुरन्स वाहन चालवणे, विनापरवाना वाहन चालवणे, विना रिफ्‍लेक्टर वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा, ट्रिपल सीट, कागदपत्रे सादर न करणे, इतर केसेसचा समावेश आहे. कशेडी विभागांतर्गत १५ हजार ४७ वाहनचालकांवर कारवाई करत ७१ लाख २७ हजार ४०० रुपये, चिपळूण विभागांतर्गत १७ हजार ९५ वाहनचालकांवर कारवाई करत १ कोटी १५ लाख २० हजार रुपये, हातखंबा विभागातंर्गत १३ हजार ८१९ वाहनचालकांवर कारवाई करत २५ लाख ९३ हजार ४०० रुपये असे २ कोटी १२ लाख ४० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विभागानुसार कारवाई कशेडी...... वाहनचालक १५ हजार ४७ दंड ७१ लाख २७ हजार ४०० रुपये चिपळूण...... वाहनचालक १७ हजार ९५ दंड १ कोटी १५ लाख २० हजार रुपये हातखंबा...... वाहनचालक १३ हजार ८१९ दंड २५ लाख ९३ हजार ४०० रुपये एकूण.... वाहनचालक ४५ हजार ९६१ दंड २ कोटी १२ लाख ४० हजार ८०० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT