मुंबई

पाताळगंगा नदी रेल्वे पुलावरील पत्र्यांना गंज

CD
पाताळगंगा नदी रेल्वे पुलावरील पत्र्यांना गंज नागरिकांसाठी पदपथ धोकादायक; रंग लावण्याची मागणी रसायनी ता. १३ (बातमीदार) : रसायनीतील चावणे ग्रामपंचायत हद्दीत कालिवली गावाजवळील पाताळगंगा नदीवरील पनवेल-रोहा दुसऱ्या रेल्वे मार्गावर नागरिकांना गुळसुंदे परिसरातील गावांकडे जाण्यासाठी पूल बांधण्यात आला आहे. या पुलावर लावण्यात आलेल्‍या पत्र्यांना गंज चढू लागला आहे. भविष्यात पत्रे कमकुवत होऊन मार्गाशेजारील पदपथ धोकादायक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पत्र्यांना रंग लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. चावणे, कासप, जांभिवली, सवणे कालिवली या चार गावांमधील आणि हद्दीतील चार आदिवासी वाड्यांतील नागरिकांना आपटे, गुळसुंदेकडे जाण्यासाठी पाताळगंगा नदीवर पूल नाही. यासाठी नागरिक चावणे येथील पाताळगंगा नदीवरील बंधाऱ्यावरून किंवा जुन्या रेल्वे मार्गावरील पुलावरून जीव धोक्यात घालून जात असतात. याशिवाय खासगी वाहनांना पाताळगंगा एमआयडीसीच्या पुलावरून वळसा घालून जावे लागते. त्यासाठी आठ ते दहा किलोमीटर अंतर जास्त मोजावे लागत आहे. यात वेळ वाया जाऊन आर्थिक भुर्दंडही बसत आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने दुसऱ्या रेल्वे मार्गाचे काम करताना रसायनीतील कालिवली गावाजवळ नदीवर पूल बांधताना मार्गिकेच्या दोन्ही बाजूने नागरिकांसाठी पदपथ बांधले आहे. तेव्हापासून पादचाऱ्यांना सोईचे झाले आहे. परिसरातील नागरिकांना जवळच्या अंतराने जाताना पुलाचा फायदा झाला आहे. मात्र, आता या पदपथाच्या पत्र्यांना गंज चढू लागला आहे. भविष्यात पत्रे कमकुवत होऊन पदपथ धोकादायक होईल, अशी शक्यता असल्याने त्यांना रंग लावण्यात यावा, अशी मागणी अतिरिक्त पाताळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष मारुती पाटील आणि इतरांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR इफेक्ट! पश्चिम बंगालमध्ये ९० लाख मतदार वगळले, निवडणूक आयोगाने यादी केली प्रसिद्ध

IPL मुळे माझं आंतरराष्ट्रीय करियर उद्ध्वस्त झालं..., केवीन पीटरसनचा खळबळजनक दावा; इंग्लंड क्रिकेटवरही आरोप

Shaktipeeth Highway Route Change : 'शक्तिपीठ' महामार्गाचा मार्ग बदलला; माण–खटावमधून जाणार, शिखर शिंगणापूर-गोंदवलेही जोडले जाणार

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ च्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन या वर्षी करण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री फडणवीस

बॉम्बस्फोट, सायरन… तरीही ‘ठरलं तर मग’! इस्त्रायलमधील प्रेक्षकांची मालिकेबाबत दिवानगी पाहून थक्क व्हाल, Viral Video

SCROLL FOR NEXT