मुंबई

कारमधील १ लाख ७० हजाराची रक्कम लांबवली

CD
तेलगळती बहाण्याने कारमधील रक्‍कम लंपास एक लाख ७० हजाराची रक्कम लांबवली नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : कारमधून तेल गळत असल्याचे सांगून दोघांनी कोपरखैरणेत राहणाऱ्या एका व्यावसायिकाची दिशाभूल केली आणि कारमधील एक लाख ७० हजारांची रोख रक्कम असलेली बॅग चोरल्‍याची घटना सोमवारी भरदुपारी वाशीमध्ये घडली. वाशी पोलिसांनी याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. अमित शेलार (२८) हा कोपरखैरणेत राहत असून त्याचे वाशीमध्ये मिठाई विक्रीचे दुकान आहे. अमित याचे चुलत बंधू प्रवीण कीर्तनकार असून गत सोमवारी त्यांना बेळगाव येथे कीर्तनासाठी जायचे होते. त्यासाठी अमित सोबत जाणार होते. प्रवीण दुपारी सानपाडा येथे अमितची वाट पहात उभे होते. तर अमित आपल्या इन्होवा क्रिस्टा कारने वाशीतील आपल्या मिठाईच्या दुकानाजवळून निघण्याच्या तयारीत होता. यावेळी चोरट्याने अमित व कारचालक अक्षयला कारमधून तेलगळत असल्याचे सांगून दिशाभूल केली. तपासणीसाठी अमित व अक्षय कारमधून उतरताच दुसऱ्याने कारच्या मागील सीटवर १ लाख ७० हजाराची रोख रक्कम असलेली कीर्तनकार जयवंत शेलार यांची बॅग चोरून पलायन केले. दिशाभूल रक्‍कम चोरल्‍याचे लक्षात येताच त्‍यांनी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT