मुंबई

नवी मुंबईत १९२ कोरोनायोध्द्यांनी घेतला प्रिकॉशन डोस

CD
नवी मुंबईत कोरोनायोद्धांना प्रिकॉशन डोस १९२ आरोग्यकर्मी व पहिल्या फळीतील वाशी, ता. १३ (बातमीदार) ः केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेनुसार आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योद्धे तसेच सहव्याधी असणारे ६० वर्षावरील नागरिक यांना प्रिकॉशन डोस देण्यास महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजनबध्दरित्या सुरुवात केली आहे. दोन दिवसात १,७९१ पात्र लाभार्थ्यांनी कोविड प्रिकॉशन डोसचा लाभ घेतलेला आहे. बुधवारी महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रामध्ये आरोग्यकर्मी व पहिल्या फळीतल कोरोना योद्धे यांच्याकरिता प्रिकॉशन डोस देण्याकरिता विशेष सत्र आयोजित केले होते. सकाळपासूनच लसीकरण सत्राला अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. १३ एप्रिल २०२१ रोजी व त्यापूर्वी कोविड लसीचा दुसरा डोस घेतलेल्या १९२ आरोग्यकर्मी व कोरोना योद्धांचे विशेष सत्रात लसीकरण करण्यात आले. यामध्ये २६ आरोग्यकर्मी तसेच १६६ पहिल्या फळीतील कोरोनायोद्धे यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. कोविडपासून अधिक संरक्षणाच्या दृष्टीने आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे ६० वर्षावरील नागरिकांना ‘प्रिकॉशन डोस’ दिला जात असून लाभार्थ्यांनी योग्य वेळेत प्रिकॉशन डोस घ्यावा. डोस घेतल्‍यानंतरही मास्क वापर आणि कोविड नियमावलीचे काटेकोर पालन करावे. - अभिजित बांगर, आयुक्‍त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT