मुंबई

मुंब्रा येथून दुचाकी चोरटा अटकेत

CD
मुंब्रा येथून दुचाकी चोरटा अटकेत डोंबिवली, ता. १३ ः मुंब्र्यासह आजूबाजूच्या परिसरातून दुचाकी चोरून त्यांची विक्री करणाऱ्या अट्टल चोरट्यास मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. शाहरुख शेख असे चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून ५ लाखांच्या एकूण १३ दुचाकी हस्तगत केल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल भिसे, उपनिरीक्षक सुनील तारमाळे यांच्या पथकाने संशयित आरोपी शाहरुखला मुंब्रा येथून ताब्यात घेत चौकशी केली. तपासात त्याने साथीदाराच्या मदतीने मानपाडा, नारपोली, चितळसर मानपाडा व डायघर तसेच इतर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. चोरी करून तो या दुचाकी मुंब्रा येथील सिया कब्रस्थानाजवळ ठेवत होता. गॅरेजमध्ये काम करीत असल्याने जशे गिऱ्हाईक येतील, तशी त्यांची विक्री करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT