sanjay raut sanjay raut
मुंबई

शिवसेना यूपीत किती जागा लढवणार? संजय राऊतांनी दिली माहिती

CD

मुंबई : शिवसेना उत्तर प्रदेशात कोणत्याही पक्षासोबत युती न करता ५० ते १०० जागा लढणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधातही शिवसेना निवडणूक लढवेल, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकीची देशभरात चर्चा सुरू आहे.

अशातच शिवसेना खासदार संजय राऊत उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी शिवसेना उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. या निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाशी युती करणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले. आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढण्याच्या प्रश्‍नावर त्यांनी खास शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, ‘आम्ही कोणाविरोधात लढणार नाही, आम्ही निवडणूक लढणार आहोत. निवडणूक कोणाही विरोधात लढली जात नाही, तर मतदार किती समर्थन देतात हे पाहण्यासाठी लढले जाते, असेही त्यांनी नमूद केले. राकेश टिकैत यांची भेट दरम्यान, संजय राऊत यांनी आज मुझफ्फरनगर येथे शेतकरी नेते राकेश टिकेत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आल्याचे ट्विट राऊत यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT