मुंबई

जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर मेघडंबरी

CD
जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर मेघडंबरी सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १३ : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर मेघडंबरी बसविण्यात येणार आहे. हा पुतळा ब्रांझचा असल्याने मेघडंबरीही ब्रांझची बसवण्यात येणार आहे. राणीच्या बागेत १९९८ मध्ये हा पुतळा बसविण्यात आला होता. बागेच्या मध्यभागी हा सव्वा मीटर उंचीचा पुतळा असून त्याचे अनावरण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. पुतळा शिल्पकार विठ्ठल सानबाग यांनी बनवला आहे. या पुतळ्यावर मेघडंबरी बसविण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार वारसा जतन (हेरिटेज) सल्लागार राहुल चेंबूर यांनी या मेघडंबरीचा आराखडा तयार केला आहे. साधारण दोन मीटर उंचीची ब्रांझपासून बनवलेली ही मेघडंबरी असेल. त्यासह इतर कामांसाठी ३८ लाख रुपयांपर्यंतचा खर्च येणार आहे. त्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. मेघडंबरी नागफणाच्या स्वरूपात आणि हेरिटेज लूक असलेली असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींना माफी पण १४ हजार पुरुष लाभार्थ्यांकडून वसुली करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठणकावले

LPG Price Hike: व्यावसायिक सिलिंडरचे दर पाच महिन्यांत दुप्पट; ४२ रुपयांनी दरवाढ, हॉटेल-ढाबा व्यवसायांवर मोठ्या परिणामांची शक्यता

Maratha Reservation: शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय; मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना एमआयडीसीत नोकरी मिळणार

हे खूप वाईट... एक्स पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणालेली तेजश्री प्रधान म्हणाली, 'त्याने जो निर्णय घेतला...'

Panchang 2 June 2026 : पंचांग! गुरु कर्क राशीत, जाणून घ्या आजचे शुभ मुहूर्त आणि राशींवरील प्रभाव

SCROLL FOR NEXT