मुंबई

ठाण्यातील हवेचा दर्जा घसरला

CD
ठाण्यातील २० पैकी १९ चौक प्रदूषित हवेचा दर्जा घसरल्याने शहरातील ५ चौक अतिप्रदूषित सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. १४ : शहरातील रस्त्यावर वाहनांची वाढलेली वर्दळ, सणांमुळे हवेची गुणवत्ता पुन्हा घसरली असल्याचे ठाणे महापालिकेच्या प्रदूषण अहवालामधून समोर आले आहे. ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी प्रमुख २० चौकात हवा गुणवत्ता मापन उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्याआधारे तब्बल १९ चौक प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. यातील १४ चौकांमध्ये प्रदूषित, तर ५ चौक अतिप्रदूषित असल्याचे या प्रदूषण अहवालात म्हटले आहे. सर्वाधिक प्रदूषण हे हे शिळफाटा चौकात नोंदवले गेले असून त्यापाठोपाठ रेतीबंदर, कॅसल मिल नाका, मुंब्रा फायर स्टेशन परिसर, तसेच बाळकूम नाका हे चौक अतिप्रदूषित आहेत. ठाणे महापालिका क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्यामुळे हवा प्रदूषित होत असल्याची बाब सातत्याने समोर येत आहे. २०२० मध्ये देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे सर्वच रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली होती. ठाणे शहरातील तीन हात नाका, कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती कार्यालय परिसर या रहिवासी क्षेत्रात, तर रेप्टाकोस कंपनी या औद्योगिक क्षेत्रात बसविण्यात आलेल्या हवा गुणवत्ता मापन उपकरणांद्वारे शहरातील हवेचे मापन आणि निरीक्षण होते. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ पुन्हा सुरू झाली. ठाणे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रदूषण अहवालामध्ये शहरातील प्रमुख २० चौकांत हवेची गुणवत्ता तपासण्यात आली आहे. यामध्ये १४ चौक प्रदूषित, तर ५ चौकातील हवा अतिप्रदूषित असल्याचे उघड झाले आहे. शहरातील २० चौकांत हवेची गुणवत्ता तपासण्यात आली आहे, ते सर्वच चौक केवळ कॅडबरी चौक वगळता प्रदूषित असल्याचे या अहवालामधून स्पष्ट झाले आहे. चौकट मुख्य चौक हवेची गुणवत्ता कॅडबरी नाका ९८ मुलुंड चेक नाका १३३ नितीन नाका १५९ बाळकूम नाका २०१ कॅसल मिल नाका २२० रेतीबंदर २२७ शिळफाटा २३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

SCROLL FOR NEXT