मुंबई

सेन्सेक्समध्ये १२ अंशांची घसरण

CD
सेन्सेक्समध्ये १२ अंशांची घसरण मुंबई, ता. १४ : जागतिक परिस्थिती सामान्य असल्याने आज भारतीय शेअरबाजारांनाही फारशी चमक दाखविता आली नाही. आज सेन्सेक्स १२.२७ अंश; तर निफ्टी २.०५ अंशांनी घसरला. अमेरिकेतील बेकारांची संख्या वाढल्याची आकडेवारी आल्याने आज आशियाई शेअरबाजारही घसरण दाखवीत होते. त्याचेच अनुकरण आज भारतीय बाजारांनी केले व दिवसअखेर किंचितशी घसरण होत सेन्सेक्स ६१,२२३.०३ अंशांवर; तर निफ्टी १८,२५५.७५ अंशांवर स्थिरावला. आज आयटी क्षेत्राचे बहुतांश शेअर वाढले. आज टीसीएस (बंद भाव ३,९६९ रु.), इन्फोसिस (१,९२८), लार्सन अँड टुब्रो (२,०४४), टेक महिंद्र (१,७३९), एचसीएल टेक या आयटी शेअरबरोबरच एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक, कोटक बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती यांचे शेअर वाढले; तर एशियन पेंट्स, अॅक्सीस बँक, हिंदुस्थान युनिलीव्हर, महिंद्र आणि महिंद्र, विप्रो, एचडीएफसी, एअरटेल हे शेअर दीड ते अडीच टक्का घसरले. नेस्ले, टायटन, डॉ. रेड्डीज लॅब, इंडसइंड बँक या शेअरचे भावही एक टक्क्याच्या आसपास कमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यातील दरी पूल परिसरात पहाटे भीषण अपघात , चार वाहने एकमेकांना धडकली अन्...

UP News : ‘फरसा वाले बाबा’ मृत्यू प्रकरण: अपघात की घातपात? मथुरेत हायवेवर राडा, CM योगी आदित्यनाथ यांचा कडक इशारा

US Iran Conflict : पुढील ४८ तासांत होर्मुझ खुली केली नाही तर इराणचे पॉवर प्लॅंट नष्ट करु, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

Nanded News: नांदेडमध्ये दुचाकीचा भीषण स्फोट; चालकाचा मृत्यू

Gold & Silver Prices: सोन्याच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी?

SCROLL FOR NEXT