मुंबई

खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाचे आज लोकार्पण

CD
खारेगाव उड्डाणपुलाचे आज लोकार्पण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. १४ : गेल्या काही महिन्यांपासून खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगल्याचे दिसून आले होते. त्यात या उड्डाणपुलाचे राष्ट्रवादीने प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण व्हावे अशी मागणी केली होती, परंतु या पुलाचे लोकार्पण शनिवारी (ता. १५) अखेर राज्याचे नगरविकास मंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हेदेखील उपस्थित राहणार आहेत. मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गिकेवरील कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान खारेगाव रेल्वे फाटक आहे. फाटकाच्या पूर्व दिशेला शाळा, मुख्य बाजारपेठ नसल्याने येथील नागरिक रेल्वे फाटक ओलांडून खारेगाव म्हणजेच फाटकाच्या पश्चिम दिशेला येत असतात. यामु‌ळे अपघातही होत असून लोकल वाहतुकीतही व्यत्यय निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर खारेगाव फाटकाजवळ रेल्वे उड्डाणपूल उभारणीचा निर्णय मध्य रेल्वे आणि ठाणे महापालिकेने घेतला होता. त्यानुसार या उड्डाणपुलाचे काम मध्य रेल्वे प्रशासन आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. आता नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरही हा पूल काही केल्या सुरू झाला नव्हता. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी कधी सुरू होणार, असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत होता. त्यानुसार आता पालिका प्रशासनाने या पुलाच्या लोकार्पणाची तयारी करून हा पूल शनिवारपासून सेवेत रुजू होणार आहे. चौकट नऊ महिन्यांचा विलंब गेल्या एप्रिल महिन्यात हा पूल खुला होईल, असे आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले होते, परंतु यात अडचणी आल्यानंतर २० डिसेंबरला हा पूल खुला होईल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा २५ डिसेंबरची तारीख पुढे आली होती. त्यानंतर रेल्वेकडून सेफ्टी ऑडिट होणार असून या ठिकाणाहून रेल्वे जाऊ शकेल का? काही अडचणी निर्माण होतील का? यासह पुलाची क्षमताही तपासली जाणार असल्याने विलंब झाला. हे सोपस्कार झाल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे पालिकेने सांगत ही तारीखही टळली. राष्ट्रवादी-शिवसेनेत कलगी-तुरा दरम्यान, या पुलाचे काम आमच्यामुळेच मार्गी लागल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच त्याचे लोकार्पण होईल असा दावा केला होता; तर राष्ट्रवादीने सुरुवातीपासून या पुलासाठी पाठपुरावा केला असल्याने या पुलाचे लोकार्पण पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते केला जाईल, असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता; मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT