मुंबई

दुकानदाराकडून १५ हजारांची लाच स्विकारताना अटक

CD
लाच स्वीकारताना महावितरणचे दोघे जाळ्यात उल्हासनगर, ता. १४ (वार्ताहर) : व्यावसायिक वीज मीटरवर ४० हजार रुपयांचा दंड ठोठावल्याने त्यावरील कारवाई टाळण्यासाठी व दंडाची रक्कम पुढील बिलात न लावण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना उल्हासनगरमधील महावितरणच्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. कॅम्प नंबर एकमध्ये रंगीला आइस्क्रीम ॲण्ड जनरल स्टोअर्सच्या तक्रारदार मालकाचे घरवजा दुकान आहे. दुकानासाठी व्यावसायिक, तर घरासाठी घरगुती मीटर आहेत. महावितरणच्या उपविभाग एकमध्ये कार्यरत असिस्टंट अकाउंटर सचिन जाधव आणि मीटर रीडर तुषार वायकर यांनी तक्रारदाराकडे व्यावसायिक मीटरवरील ४० हजार रुपयांचा दंड टाळण्यासाठी आणि पुढील बिलात ही रक्कम न लावण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार आज (ता. १४) पैसे देण्यात येणार होते. या प्रकरणी ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. पोलिस निरीक्षक पल्लवी ढगे-पाटील यांनी सापळा रचून सचिन जाधव, तुषार वायकर यांना अटक केली. दोघांच्याही घरांची झाडाझडती करण्यास सुरुवात करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Mega Block : कांदिवली-बोरिवलीदरम्यान रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक; लोकल वाहतुकीत बदल

Maharashtra: आधार आणि किसान आयडी ब्लॉक, सरकारी योजनांपासून दूर ठेवणार अन्...; शेतरस्त्यावर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई होणार

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार केले, नंतर...; धक्कादायक कृत्याने खळबळ, काय घडलं?

Gas Cylinder Shortage : कुंपणच शेत खातेय! हॉटेल सुरू, पण घरगुती गॅस टंचाई; नागरिकांचा संताप टोकाला, बुकिंग करूनही प्रतीक्षा

Food Poisioning : शासकीय नर्सिंग कॉलेजच्या ४५ विद्यार्थिनींना विषबाधा; सर्व विद्यार्थिनीं धोक्याबाहेर

SCROLL FOR NEXT