मुंबई

कोळीवाडे, गावठाणातील घरांचा सरसकट मालमत्ता कर माफ करा!

CD
कोळीवाडे, गावठाणातील घरांचा सरसकट मालमत्ता कर माफ करा! सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १४ : मूळ मुंबईकर असलेल्या गावठाण, कोळीवाड्यातील घरांचा सरसकट मालमत्ता कर माफ करा, अशी मागणी भाजप नेते आमदार अॅड. आशीष शेलार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्याच्या समर्थनासाठी वांद्रेतील खारदांडा येथे भाजपतर्फे दोन दिवसांचे स्वाक्षरी अभियान राबवण्यात येत आहे. मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या आगरी-कोळी बांधवांची मुंबईत ८४ हून अधिक गावठाण आणि कोळीवाडे आहेत. यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली (डिसीआर) नसल्याने त्यांंचा पुनर्विकास होऊ शकलेला नाही. या मूळ मुंबईकरांची जुनी बैठी घरे असून त्यांचे क्षेत्रफळ ५०० फुटांंपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सरकारने मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा जो निर्णय घोषित केला, त्याचा फायदा या गावठाण व कोळीवाड्यांतील घरांना होणार नाही. एकीकडे कोस्टल रोड, समुद्राचे पाणी गोडे करणे यासारख्या प्रकल्पांंमुळे कोळीबांधवांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. निसर्गातील बदलांमुळे त्यांचा मासेमारी व्यवसाय अडचणीत असताना सरकारकडून डिझेल परतावाही त्यांना वेळेत मिळत नाही. त्यामुळे मच्छीमार बांधव प्रचंड अडचणीत आहेत. त्यामुळे या मूळ मुंबईकरांचा अत्यंत संवेदनशीलपणे सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे सांगत शेलार यांनी कोळीबांधवांच्या घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT