मुंबई

हेल्थ कर्मचार्‍यांचा बुस्टर डोस लांबणीवर

CD
हेल्थ कर्मचाऱ्यांचा बूस्टर डोस लांबणीवर फ्रंटलाईन वर्कर्स पॉझिटिव्ह आल्याने लसीकरणात अडचण सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १४ : राज्यातील हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा बूस्टर डोस लांबणीवर जाणार आहे. कारण राज्यातील हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह आल्याने पुढचे किमान तीन महिने ते बूस्टर डोस घेऊ शकणार नाहीत. यातून लसीकरणाच्या या टप्प्यात अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, चार दिवसांत दोन लाख ४९ हजार ७९३ कर्मचाऱ्यांना डोस देण्यात आले आहेत. राज्यात आतापर्यंत दोन लाख ४९ हजार ७९३ जणांना बुस्टर डोस देण्यात आला असून या तिसऱ्या डोससाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आरोग्य अधिकारी सांगतात. राज्यात १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली असून यात आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन आणि अति जोखमीचे रुग्ण गणले गेले आहेत; मात्र त्यांच्या दुसऱ्या डोसचा कालावधी संपलेला असावा अशी अट आहे. तसेच जर कोणी पॉझिटिव्ह आढळून आले तर पुढचे किमान तीन महिने डोस घेता येणार नाही. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढलेला दिसून येत नसल्याचे राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले. बूस्टर डोस हा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम असून पहिल्या दोन दिवसांतच राज्यात ५६,४६४ आरोग्य कर्मचारी; तर २८,११९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यात आले. दरम्यान, मुंबईत पहिल्या दिवशी ३,१३८ जणांनी पहिला डोस घेतला; तर दुसऱ्या दिवशी ५,६३५ जणांनी; तर तिसऱ्या दिवशी सहा हजार ६८९ जणांनी डोस घेतला. राज्यातील इतर जिल्ह्यांत बूस्टर डोस घेण्याचे प्रमाण चांगले असले, तरी ग्रामीण भागातील काही ठिकाणी बूस्टर डोस घेण्यास कर्मचारी समोर येत नसल्याचे चित्र आहे; मात्र लसीकरणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमानुसार यापुढे लसीकरणाला गर्दी वाढत जाण्याची शक्यता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. यातून बूस्टर डोसचे उद्दिष्ट नक्की पूर्ण होईल, अशी आशा त्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, काही आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये व डॉक्टरांमध्ये उत्सुकता आहे. शिवाय, अनेकांना यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. .... पॉझिटिव्ह आल्याने बूस्टर डोस लांबणीवर सध्या हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्स मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना बूस्टर डोस घ्यायचा आहे, पण आजारी पडल्याने तीन महिन्यांनंतर त्यांना बूस्टर डोस घ्यावा लागणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही गैरसमज नाही, पण पॉझिटिव्ह आल्याने डोस घेता येत नाही, ही मुख्य अडचण आहे. डॉ. सचिन देसाई, लसीकरण अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

Why Grape Farmers Face Losses? द्राक्षबागेत पीकच न आल्याने शेतकऱ्याने झाडाला घेतला गळफास; साडेतीन ते चार एकरांत केली होती द्राक्ष शेती!

Hailstorm Damage: हातातोंडाशी आलेला घास हिरावला! मध्यरात्री गारपिटीचा तडाखा; आंबा-संत्रा बागांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी!

Ashok Kharat: ५८ व्हिडिओनंतर नवा धक्का... कॅप्टन खरात प्रकरणात SIT ची स्थापना, मध्यरात्री फार्महाऊसमध्ये काय सापडलं?

Success Story: जिद्द, परिश्रमाच्या जोरावर उभारली उत्तुंग यशाची गुढी; कोमल ढवळे यांची सहाय्यक राज्य कर आयुक्त पदावर झेप!

SCROLL FOR NEXT