मुंबई

उद्यापासून हार्बर मार्गावर १२ ऐवजी १६ एसी लोकल

CD
आधीच थंडी, त्यात वाढता थंडावा हार्बर रेल्वेवर आता १६ एसी लोकल फेऱ्या सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १४ : हार्बर रेल्वेवरील सीएसएमटी ते वाशी/पनवेल आणि वांद्रे/गोरेगाव स्थानकांदरम्यान आता १२ ऐवजी १६ एसी लोकल सेवा शनिवारपासून (ता.१५) सुरू होणार आहेत; तर काही एसी लोकल सेवा सुट्टीच्या दिवशी आणि रविवार ‘नॉन एसी’ लोकल सेवा म्हणून चालवल्या जातील. मध्य रेल्वेच्या ताफ्यात सर्वप्रथम एसी लोकल जानेवारी २०२० रोजी ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान धावण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान, डिसेंबर २०२० पासून दुसरी एसी लोकल सुरू केली. मध्य रेल्वेने साध्या लोकलच्या फेऱ्या रद्द करून त्याऐवजी एसी लोकल चालविण्यास सुरुवात केली. मात्र, एसी लोकलच्या जादा तिकीट दरामुळे प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली. सामान्य लोकलच्या फेऱ्या  रद्द केल्याने या वेळेतील इतर उपनगरी गाड्यांच्या प्रवासी संख्येत भर पडली. ट्रान्सहार्बर मार्गावर धावणाऱ्या १६ एसी उपनगरी रेल्वेगाड्यांना प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने या एसी गाड्यांचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला. सध्या सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव आणि वाशी/पनवेल स्थानकादरम्यान १२ एसी लोकल सेवा सुरू केल्या होत्या. मात्र, आता आणखी चार एसी लोकल वाढविण्यात आल्या आहेत.   ... वेळापत्रक - वाशी पहाटे ५.२७ सीएसएमटी सकाळी ६.१६ - सीएसएमटी सकाळी ६.२४, पनवेल सकाळी ७.४४ - पनवेल सकाळी ७.५५ , वडाळाला रोड सकाळी ८.५६ - वडाळा रोड ९.८ , पनवेल सकाळी १०.१० - पनवेल सकाळी १०.१७, सीएसएमटी सकाळी ११.३६ - सीएसएमटी सकाळी ११.४०, पनवेल दुपारी १.०१ - पनवेल दुपारी १.०९ सीएसएमटी दु. २.२८ - सीएसएमटी दु. २.३४ , पनवेल दु. ३.५४ - पनवेल सायंकाळी ४.०१, सीएसएमटी सायं. ५.२० - सीएसएमटी सायं. ५.२६ वाशी सायं.६.१६ - वाशी सायं. ६.२६, सीएसएमटी सायं.७ .१७ - सीएसएमटी सायं. ७.२४ वांद्रे सायं. ७.५४ - वांद्रे रात्री ८.०२. सीएसएमटी रात्री ८.३२ - सीएसएमटी रात्री ८.३६, गोरेगाव रात्री ९.३२ - गोरेगाव रात्री ९.४३ , सीएसएमटी रात्री १०.३८  - सीएसएमटी रात्री १०.४५. वाशी रात्री ११.३४ ... पश्चिम रेल्वे १,३७५ एकूण फेऱ्या यांपैकी १६ एसी लोकलच्या फेऱ्या मध्य रेल्वे १,७७४ एकूण फेऱ्या आठ एसी लोकल फेऱ्या हार्बर रेल्वे ६१४ एकूण फेऱ्या यांपैकी १६ हार्बर मार्गावर एसी लोकल ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT