मुंबई

दुर्गा गुडिलू यांना बजाज पुरस्कार

CD
दुर्गा गुडिलू यांना बजाज पुरस्कार मुंबई, ता. १५ ः इंडियन मर्चंट्स चेंबरच्या महिला शाखेतर्फे दिला जाणारा २०२१ चा जानकीदेवी बजाज पुरस्कार दुर्गा मल्लू गुडिलू यांना मिळाला. कोविडयोद्धा म्हणून उत्तम काम केल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला. पुरस्काराचे हे २८ वे वर्ष आहे. दुर्गा या वैदू समाजाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्या असून त्या अनुम फाऊंडेशनच्या विश्वस्त आहेत. महाराष्ट्र वैदू विकास समितीमार्फतही त्या शिक्षण, आरोग्य, पोषण, पर्यावरण, रोजगारनिर्मिती आदी क्षेत्रांमध्ये वेगवगेळी कामे करतात. कोविडकाळात श्रीमती दुर्गा यांनी वेगवेगळ्या प्रकारे समाजाची तसेच कोविडबाधितांची सेवा केली. बजाज इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष शेखर बजाज यांच्याहस्ते त्यांना गौरविण्यात आले. रोजंदारीची कामे करणाऱ्या वैदू समाजाला कोविडकाळात रोजगार व रोजचे जेवणही मिळणे कठीण झाले. त्यावेळी गरजूंना अन्नधान्य, औषधे व अन्य जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी श्रीमती दुर्गा यांनी धडपड सुरू केली व हजारो कुटुंबांना साह्य केले. त्याचप्रमाणे त्यांनी समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण मोहीम व जनजागृती मोहीमही सुरू केली. वंचित मुलांना ई-शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी सुरू केलेल्या ‘मेरा शिक्षण’ योजनेचा लाभ साडेचारशे मुलांना झाला. त्याचबरोबर त्यांनी वीस हजार मुलांना मध्यान्न आहार, तसेच पंधरा हजार मुलींना सॅनिटरी नॅपकीन पुरवून त्यांची काळजी घेतली. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri News: रस्त्याचे काम... तासभर जागेवरच थांब! पिंपरी ‘एमआयडीसी’ परिसरात वाहतूक कोंडी; प्रशासनाच्या नियोजनावर संताप..

Solapur Sugarcane payment: साेलापूर जिल्ह्यात ११०० कोटींची ऊसबिले थकली; शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाले तीन हजार ४७६ कोटी, तीव्र संताप व्यक्त!

Gautam Gambhir: स्वत:साठी नव्हे, करंडकासाठीच खेळा! विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक गंभीर यांचा भारतीय संघासाठी मंत्र

Pune Health Crisis: पुण्यात तरुणाईवर अदृश्य संकट! ७५ हजारांना बीपी, ४४ हजारांना मधुमेह; जीवनशैलीचे आजार वेगाने पसरतायत

CJI Surya Kant: सुप्रीम कोर्टात अचानक तणाव; सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले... तरुण वकिलाने नेमकं काय केलं?

SCROLL FOR NEXT