crime news
crime news esakal
मुंबई

ठाणे : बनावट कोविड प्रमाणपत्र विक्रीप्रकरणी तरुणाला अटक

CD

ठाणे : कोरोना प्रतिबंधक लसीचा (corona vaccination) कोणताही डोस न घेता नागरिकांना अवघ्या ७०० रुपयांत दोन्ही डोस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र (fake certificate) तयार करून विकणाऱ्या तरुणास अटक (culprit arrested) करण्यात आली आहे. नालासोपारा, वसई रोड येथील सौरभ बजरंगी सिंग (वय १९) याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले. त्याने अनेक नागरिकांना बनावट प्रमाणपत्र देत १५ हजार रुपये घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. (Culprit arrested in fake vaccination certificate selling crime)

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक ठिकाणी कोविड प्रतिबंधक लसीच्या प्रमाणपत्राची आवश्‍यकता भासत आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे; मात्र सौरभ सिंग हा नागरिकांना ७०० रुपयांत बनावट कोविड लसीकरण प्रमाणपत्र देत होता. याबाबत राबोडीतील फजलुर रहेमान शेख यांनी ठाणे नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून सौरब सिंग याला अटक केली. पुढील तपास खंडणीविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक एस. आर. हुबे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT