मुंबई

२४ तासात ३६६ पोलिस कोरोनाबाधीत

CD
२४ तासात ३६६ पोलिस कोरोनाबाधित सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १५ ः कोरोनाचा राज्यभर कहर सुरू आहे. रोजच फिल्डवर असणारे पोलिसही यातून सुटलेले नाहीत. एकाच दिवसात मुंबई पोलिसांमध्ये ३६६ पोलिस कोरोनाबाधित झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. गेल्या २४ तासांतला हा उच्चांकी आकडा आहे. बुधवारी एका दिवसात बाधित होणाऱ्या पोलिसांची संख्या १४५ होती. ती आता ३६६ वर पोहोचली आहे; तर राज्यातल्या गेल्या २४ तासांतल्या बाधित पोलिसांची संख्या ४५३ इतकी आहे. सध्या मुंबईत १२५३ पोलिस कोरोनाबाधित आहेत; तर राज्यभरात २८९० पोलिस बाधित आहेत. तसेच राज्यभरात १०९६ पोलिस अधिकारी आणि ८५६ पोलिस कर्मचारी विलगीकरणात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. फिल्डवर असलेले आणि कोरोनाबाधित झालेल्या मुंबई पोलिस कर्मचाऱ्यांना काही लक्षणे दिसत नाहीत आणि त्रासही होत नाही. पण चाचणी केल्यावर मात्र पॉझिटीव्ह येत आहेत. पोलिसांत पॉझिटिव्हिटी रेट जास्त असला तरीही मृत्युदर मात्र एकदम कमी आहे. तरीही सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पोलिसांत कोरोनाचा कमीत कमी प्रसार व्हावा यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT