cyclone
cyclone esakal
मुंबई

मुंबई : नैसर्गिक संकटांत ३४० व्यक्तींचा मृत्यू

CD

मुंबई : २०२१ मध्ये राज्याला चक्रीवादळे, अतिवृष्टी, भूस्खलन आणि दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींचा (Natural calamities) मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. त्यात मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानी झाली. गेल्या वर्षभरात ३४० व्यक्तींचा अशा प्रकारच्या संकटात मृत्यू झाल्याची (people death) माहिती हवामान विभागाचे संचालक (पुणे विभाग) के. एस. होसाळीकर (k s hosalikar) यांनी एका ट्विटद्वारे दिली आहे. २०२१ मध्ये पाच उष्णकटिबंधीय चक्रीवादळे उत्तर हिंद महासागरात (Hindi ocean) तयार झाली. शिवाय बंगालच्या उपसागरावर तीन आणि अरबी समुद्रावर दोन चक्रीवादळे झाली. (three hundred and fourty people died due to natural calamities)

त्या व्यतिरिक्त अत्यंत मुसळधार पावसामुळे पूर, भूस्खलन, वीज पडणे, गडगडाट, दुष्काळ इत्यादी दुर्घटनाही राज्याच्या विविध भागांत घडल्या. भारतीय हवामान विभागाने २०२१ मधील तापमान आणि पावसाच्या हंगामाबाबतचा आपला वार्षिक अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार २०२१ मध्ये भारतातील वार्षिक सरासरी जमिनीच्या पृष्ठभागावरील हवेचे तापमान सरासरीपेक्षा ०.४४ अंश सेल्सिअसने जास्त होते.

१९०१ मध्ये देशव्यापी नोंदी सुरू झाल्यापासून २०२१ हे पाचवे सर्वात उष्ण वर्ष ठरले. तथापि, २०१६ मध्ये भारतात आढळलेल्या सर्वाधिक तापमानवाढीपेक्षा ते कमी आहे. २०२१ हे पाचवे सर्वांत उष्ण वर्ष १९९७ पासून देशातील तापमान सरासरीच्या तुलनेत वाढलेलेच दिसून येत आहे. सुमारे २५ वर्षांच्या कालावधीत एकदाही वार्षिक तापमान सरासरीच्या खाली नोंदविले गेले नसल्याचे १९०१ पासूनच्या नोंदीवरून स्पष्ट होते. १२० वर्षांमध्ये २०२१ हे पाचवे सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग! महाराष्ट्रात भूपेंद्र यादव यांच्याकडे दिली मोठी जबाबदारी

Latest Marathi Live Updates : ग्रीड तुटल्याने दिल्ली विमानतळावरील वीज पुरवठा खंडीत

T20 Cricket : कॅच घ्यायचाच नव्हता मात्र जिवावर बेतलं अन्... टी 20 सामन्यातील या व्हिडिओची सगळीकडं चर्चा

Nashik Crime News : जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाला अटक! मंदिर परिसरात सापडलेल्या मानवी कवट्या प्लॅस्टिकच्या

Government Employees Retirement : निवृत्तीचं वय अन् महागाई भत्ता, दोन्ही वाढणार! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं?

SCROLL FOR NEXT