मुंबई

महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात चार जखमी

CD
महामार्गावर दोन अपघातांत चार जखमी मनोर, ता. १५ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज दोन अपघात झाले. कुडे गावच्या हद्दीत झालेल्या अपघातांत तीन दुचाकीस्वार, तर सातीवली गावातील तिहेरी अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. जखमींना मनोरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास महामार्गावर कुडे गावात जाण्यासाठी दुचाकीस्वार मधुकर कुवरा (वय ५०) हे वळण घेत होते. त्याचवेळी गुजरात मार्गिकेवरील भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघे जखमी झाले आहेत. त्यात कुवरा हे गंभीर जखमी झाले आहेत; तर दुसऱ्या अपघातात महामार्गावरील सातीवली गावच्या हद्दीत आज दुपारी डायमंड हॉटेलसमोर कार बंद पडली होती. या कारला भरधाव कंटेनरने धडक दिल्याने दुभाजक ओलांडून मुंबई वाहिनीवर उलटल्याने तिहेरी अपघात झाला. या अपघातग्रस्त कंटेनरला दुसऱ्या कार आणि कंटेनरने धडक दिली. यात पहिल्या कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी (ता. १४) दुपारी वरई पारगाव रस्त्यावर साखरे गावच्या हद्दीत भरधाव कारने ट्रकला धडक दिल्याने अपघात झाला होता. अपघातग्रस्त कार मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाची ठेकेदार कंपनी जी. आर. इन्फ्रा कंपनीची असल्याची माहिती पुढे येत आहे. चौकट दुचाकीस्वाराचा मृत्यू शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी चहाडे-तांदुळवाडी रस्त्यावर वसरे गावच्या हद्दीत कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जीवराज वासुदेव गांगडे (वय ३०, राह. खडकोली) याचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT