BMC sakal media
मुंबई

मुंबई : लसीकरणामुळे मुलीचा मृत्यू नाही! व्हायरल ट्विटनंतर पालिकेची चौकशी

लसीकरणामुळे मुलीचा मृत्यू नाही!

CD

मुंबई : कोविड प्रतिबंधक लस (corona vaccination) घेतल्यानंतर घाटकोपर येथील १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची पोस्ट एका डॉक्टरने ट्विटरवर केली होती. महापालिकेने याप्रकरणी चौकशी केल्यांनतर या मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack) झाला असल्याचे आढळले आहे. तसे ट्विटही मुंबई महापालिकेने केले असून अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. (Girl death is not due to corona vaccination)

घाटकोपरमधील डॉ. तरुण कोठारी यांनी या मुलीबाबत ट्विट केले होते. दरम्यान, या प्रकरणानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून या प्रकरणात सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. घाटकोपर येथील या मुलीने ८ जानेवारी रोजी राजावाडी रुग्णालयात लस घेतली होती.

त्यानंतर ११ जानेवारी रोजी या मुलीचा मृत्यू झाला होता. लसीकरणामुळे मुलीचा मृत्यू झाला नसल्याचे त्याच्या कुटुंबाचे म्हणणे आहे, असा दावा महापौरांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात मृत्यू प्रमाणपत्र कोणी दिले, शवविच्छेदन का नाही झाले, असे प्रश्न महापौरांनी उपस्थित केले. तसेच या प्रकरणात चौकशीचे आदेशही महापौरांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरात कोठडीत बसून सांगतोय पोलिसांचं भविष्य; पुणे,मुंबईतील भागिदारांचीही SIT चौकशी होणार, अनेकजण आयकरच्या रडारवर

‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 3 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा SIT चौकशी होण्याची शक्यता

Beed News: अजिंठा डोंगररांगेत निसर्गाचे १४ नवीन झरे शोधले; १९१०च्या ब्रिटिश नकाशातील दोन झरे अजूनही जिवंत

Sunday Gold Rate: रविवारी सोनं पुन्हा घसरलं! मुंबईतले भाव सर्वात कमी; तुमच्या शहरातले दर काय?

SCROLL FOR NEXT