मुंबई

वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलेल्या ३ बांग्लादेशी महिलांची मुक्तता

CD
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना अटक सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १५ ः मुंबईतल्या ग्रँटरोड परिसरात जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलेल्या तीन बांगलादेशी तरुणींची मुंबई पोलिसांनी सुटका केली आहे. तिघीही बेकायदेशीर मार्गाने भारतात आणल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या कागदपत्रांचा तपास करण्यात येत आहे. तिन्ही महिलांसह त्यांच्या मॅनेजर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतल्या डी. बी. मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप खुडे यांना माहिती मिळाली होती की, ग्रँटरोडच्या सिम्प्लेक्स इमारतीत वेश्या व्यवसाय सुरू आहे. तिथे बांगलादेशी तरुणींना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला. एक बनावट गिऱ्हाईक तयार करून त्याला त्या इमारतीत शहानिशा करण्यासाठी पाठवण्यात आले. तोपर्यंत पोलिस पथक दबा धरून बसलेले होते. ठरल्याप्रमाणे बनावट ग्राहक जेव्हा तिथल्या मॅनेजरला पैसे देऊन रूममध्ये गेले, तेव्हा त्याने पोलिस पथकाला इशारा केला. तेव्हा पथकाचे नेतृत्व करणाऱ्या पोलिस निरीक्षक सणस यांनी पथकाला घेऊन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर छापा टाकला. तेव्हा गिऱ्हाईकांना शोधून आणणारी महिला, तिथली मॅनेजर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वेश्या व्यवसायासठी तिथे राहत असलेल्या मुली आणि महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तिन्ही बांगलादेशी महिला आणि त्यांची मॅनेजर लक्षी गायकवाड यांच्यावर स्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमानुसार दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Private Bus Ticket : चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास महागला! कोल्हापूर ते मुंबई तिकीट दर पोहोचला 2700 रुपयांवर...; खासगी आराम बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल

Thane News: ठाण्यात दणदणाट! विसर्जन मिरवणुकांचा आवाज १०५ डेसिबलवर, ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Sudan Gold Mine Collapse : सोन्याची खाण कोसळली; ११ कामगारांचा मृत्यू, ३० जखमी, आठवडाभरात दुसरी दुर्घटना

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

विलासराव देशमुखांसमोर जिनिलियाने केलं असं काही, रितेशलाच बसला धक्का; म्हणाला, “मी दचकलो…”

SCROLL FOR NEXT