Crime News sakal media
मुंबई

गांगुलीच्या नावाने पाठवला मेल; BCCIमध्ये नोकरीचं गाजर दाखवून तरुणांना गंडा

अध्यक्ष, सीईओंच्या नावाने अनेकांना नियुक्तीचे पत्र

CD

नवी मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (BCCI) नोकरीचे प्रलोभन दाखवून (Job decoy) अनेक बेरोजगारांची फसवणूक (job fraud) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav ganguli), जय शहा (jay shah), सीईओ विनोद रॉय, डी. के. जैन यांच्या नावाने भामट्याला आलेले ई-मेल तरुणांना पाठवून साडेपाच लाख रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात (Rabale police station) फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला. (Police complaint filed against culprit in bcci job decoy crime)

ऐरोली सेक्टर- २ मध्ये राहणाऱ्या मनीष पेंटर याने बीसीसीआयमध्ये आपली ओळख असल्याचे भासवले होते. याच ओळखीतून सुरक्षा रक्षक, मैदानातील कर्मचारी, देखभाल करणारे व इतर विविध पदांवर नोकरी मिळवून देत असल्याची माहिती त्याने ओळखीतील लोकांकडून पसरवली होती. या जाहिरातबाजीला भुलून अनेक बेरोजगार तरुण-तरुणींनी या भामट्याची भेट घेत नोकरीसाठी पैसे दिले होते. कळवा येथील राहणाऱ्या श्रीकृष्ण जावळे (वय २६) याने २०१७ मध्ये मनीष याची ऐरोलीतील घरी भेट घेतली होती. त्या वेळी मनीषने सांगितल्यानुसार सहायक मैदान कर्मचारी पदावर नोकरीसाठी श्रीकृष्णने ५० हजार रुपये दिले होते.

त्यानंतर श्रीकृष्ण याला बीसीसीआयच्या लेटरहेडवर सीईओ विनोद रॉय यांचे नाव व सही असलेले सुपरवायझर पदावर नेमणुकीचे पत्र दिले. ठरल्याप्रमाणे नोकरी न मिळाल्याने श्रीकृष्ण व अन्य तरुण-तरुणींनी विचारपूस केली असता मनीष याने विविध कारणे सांगून वेळ मारून नेली. तसेच पैसे परत देण्यात टाळाटाळ केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News: पालघर-संभाजीनगर बसला अपघात, 25हून अधिक प्रवासी जखमी

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT