KEM Hospital Students Ragging  skal
मुंबई

केईएम रॅगिंग प्रकरणी | केईएमसमोर उद्या मूक निदर्शने

CD

मुंबई : केईएम रुग्णालयात दलित विद्यार्थ्याच्या रॅगिंगप्रकरणी एफआयआरमध्ये नाव असलेल्या एकाही आरोपीला अटक झालेली नाही किंवा त्यांना चौकशीलाही बोलावले गेलेले नाही. केईएम रुग्णालयातर्फे प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती दिली जात आहे, असा आरोप करीत त्याचा निषेध करण्यासाठी जाती अंत संघर्ष समिती व दलित पँथर सुवर्ण महोत्सव समितीने मंगळवारी (ता. १८) मूक निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. (KEM Hospital Students Ragging)

रुग्णालयाबाहेर निषेध व्यक्त केला जाणार आहे. प्रकरण दाबण्याचा व आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न कॉलेज अधिष्ठाता व पोलिसांकडून होत असल्याचा आरोप जाती अंत संघर्ष समितीने केला आहे. पीडित विद्यार्थ्याने भोईवाडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. एससी-एसटी आयोग (महाराष्ट्र) यांनीही त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या सुनावणीत तत्कालीन महाविद्यालय अधिष्ठाता व पोलिसांना तात्काळ रॅगिंग व ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते; परंतु तरीही पोलिस प्रशासनाने तात्काळ एफआयआर नोंदविला नाही, असे जाती अंत संघर्ष समितीचे प्रमुख कॉ. सुबोध मोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशी, कोर्टाचा मोठा निर्णय; ६० दिवसात निकाल अन् शिक्षेची सुनावणी

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणातील निकाल काही क्षणांत.. कोर्टात काय घडतंय? वाचा सर्व अपडेट्स

Palghar: पालघर बनणार चौथी मुंबई ! गेमचेंजर प्रकल्पांना गती येणार, कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Malware Alert : लॅपटॉप-कॉम्प्युटरवर WhatsApp वापरताय? CERT-In ने दिला गंभीर इशारा, 'हा' मेसेज बघताच बँक अकाउंट होईल रिकामं

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

SCROLL FOR NEXT