मुंबई

बुलीबाई ॲप प्रकरण ः तीन आरोपींनी केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण

CD
‘बुलीबाई’प्रकरणी न्यायालयाने गुरुवारपर्यंत निकाल राखून ठेवला मुंबई, ता. १८ : बुलीबाई ॲप प्रकरणातील तीन आरोपींनी केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारी पूर्ण झाली असून दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवार (ता. २०) पर्यंत निकाल राखून ठेवला आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी विशालकुमार झा, श्वेता सिंह आणि मयांक रावत यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. प्रकरणातील एक आरोपी नीरज बिश्नोईला अटक झाली आहे. त्याची आणि अन्य आरोपींची एकत्रित चौकशी करायची आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. आरोपींनी जाणीवपूर्वक ओळख लपवून शीख समुदायातील व्यक्तींची नावे वापरून ट्विटरवर पोस्ट केली आणि दोन समाजघटकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पोलिसांनी केला आहे. मुस्लिम समाजातील महिलांबाबत आक्षेपार्ह तपशील ॲपमध्ये आहे. ॲपची निर्मिती आपण केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे, असा पोलिसांचा दावा आहे. आरोपींना नुकताच कोविडचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना सरकारी रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: ऋतुराज गायकवाड कर्णधार, पृथ्वी शॉही महाराष्ट्र संघात; पहिल्याच सामन्यात शुभमन-अभिषेकच्या संघाला भिडणार

Crime: धक्कादायक! अनेक तरुणींसोबत तब्बल लग्नाची रात्र ५५ वेळा साजरी; वधूसोबत नको ते कृत्य, एका वराची हादरवणारी कथा

Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं?

Latest Marathi News Live Update: भारतीय अन्न महामंडळाची पहिली मालवाहू धान्य रेल्वे आज काश्मीरमध्ये पोहोचली

Ahilyanagar Crime: 'जामखेड गोळीबारातील तीन आरोपी जेरबंद'; गावठी पिस्तूल व काडतुसे हस्तगत

SCROLL FOR NEXT