मुंबई

अन पोलीस बंदोबस्तात आयुक्त पोहोचले घरी

CD
पोलिस बंदोबस्तात पालिका आयुक्त घरी पोहोचले सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. १९ ः एमएमआरडीए योजनेतील घर घोटाळ्या प्रकरणावरून ठाणे महापालिका आयुक्तांवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यानंतर बुधवारी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आयुक्तांवर सकाळी शाई टाकण्यासाठी येणार असल्याची कुणकुण लागली होती. त्यानुसार पालिका मुख्यालयाला पोलिसांनी वेढा घातला होता. मात्र, सकाळऐवजी कार्यकर्ते संध्याकाळी येणार असल्याची माहिती मिळताच आयुक्त पोलिस बंदोबस्तात घरी परतले. दिवा येथील एमएमआरडीए योजनेतील घर घोटाळा प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारपासून पालिका मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते. या प्रकरणावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर बुधवारी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शाई फेकण्यासाठी येणार असल्याची कुणकुण लागल्याने सकाळपासून पालिका मुख्यालयाला पोलीस छावणीचे रूप आले होते. पालिकेच्या चारही प्रवेशद्वारांवरून आत जाणाऱ्यांची पूर्ण तपासणी करूनच प्रवेश दिला जात होता. पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेरही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांची सकाळपासून महापालिका मुख्यालयात टेहळणी सुरू होती. पालिका आयुक्तही सकाळी पालिकेच्या वाहनातून न येता खासगी वाहनातून पालिकेत आले. त्यानंतर सायंकाळी पुन्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार, अशी कुणकुण लागल्याने पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात आयुक्तांना वाहनात बसविण्यात आले आणि ते घरी गेले. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT